लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
बीड : दि. २६ डिसेंबर, जिल्ह्यातील आष्टी विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी काही गौप्यस्फोट केले असल्याने बीडचे राजकारण तापलं आहे.
विरोधी पक्षाकडून सातत्याने सत्ताधारी पक्ष व माजी पालकमंत्री श्री. धनंजय मुंडे यांचेवर प्रचंड आरोप होत असून त्यातच आता बीड जिल्ह्यातील भाजपचे आमदार सुरेश धस यांनी टीव्ही 9 मराठी या न्यूज वाहिनीवर बोलतांना मोठा गौप्यस्फोट केला आहे. टीव्ही 9 मराठी यांनी त्यांना प्रश्न केला की, तुम्ही नाव का घेत नाही, तुमच्यावर दबाव आहे का? त्यावर ते म्हणाले की, “मी आता नाव घेणार नाही. परंतु आकाच्या आदेशाशिवाय हे होऊ शकत नाही. आकाच्या सर्व गाड्या विष्णू चाटेच्या नावावर आहेत. विष्णू चाटे आदेश देत असताना आकाशी बोलत होता. त्याला कसं मारतोय, कसं क्रुरतेने मारतोय हे व्हिडीओ कॉल करून दाखवलं आहे. असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, माझं स्टेटमेंट झालं असून मी कधीही कुणाला घाबरत नाही. आधी हे फक्त परळीपर्यंत घडत होतं. परंतु आता त्यांनी खंडणी, अपहरणाचं कार्यक्षेत्र त्यांनी केज, बीडपर्यंत वाढवलं आहे. त्याच्या बोलण्याचा रोख हा माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांचेवर होता, हे विशेष.
हे ही वाचा,
पुनः परीक्षा रद्द; चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँक पदभरती शिपाई पदाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर