लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
भंडारा, दि. २३ जुलै : कोणतीही महसूली कारवाई न करता अवैध वाळू वाहतूक सुरु ठेवण्यास परवानगी देण्यासाठी ३० हजार रूपयाची लाच मागणाऱ्या भंडारा जिल्ह्याच्या मोहाड़ी तहसीलदार यांना भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारतांना रंगेहात अटक केली आहे.
गजानन बोंबुर्डे असे अटक करण्यात आलेल्या तहसीलदारांचे नाव आहे. लाच प्रकरणात एका बड्या अधिकाऱ्याच्या अटकेने जिल्ह्यात चर्चेला उत आले आहे.
तक्रारदार हे वाळू व्यावसायिक असून त्यांच्या कड़े असलेल्या २ ट्रेक्टर ने अवैधरित्या वाळू वाहतूक सुरु ठेवण्यासाठी आरोपी तहसीलदार गजानन बोंबुर्डे यांनी प्रति ट्रेक्टर १५ हजार या प्रमाणे २ ट्रेक्टर चे ३० हजार हप्ता लांच मागितली. मात्र तक्रारदार यास लांच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी भंडारा लांच लुचपत प्रतिबंधक विभाग गाठत या बाबत तक्रार दिली. तक्रारीची शहानिशा करत आज सापळा रचला असता पंचासमक्ष आरोपिला ३० हजार रूपयांची लांच घेतांना रंगेहात अटक केली आहे.
आरोपी तहसीलदार विरुद्ध लांच लुचपत प्रतिबंधित कायद्याद्वारे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी ही वाळू वाहतुकीतुन मिळणाऱ्या मलाई पोटी अनेक अधिकाऱ्यांचा बळी गेला आहे. लांच लुचपत विभागाने एका बड्या अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्याने जिल्ह्यातील इतर भ्रष्ट अधिकाऱ्यांचे दाबे दणाणले आहे.
हे देखील वाचा :
जनविरोधी धोरणांच्या विरोधात लढा तीव्र करणार : तिसऱ्या आघाडीची गडचिरोली बैठक
मोठी बातमी : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर ९९ वर्षांनी नाशिकचा सुपुत्र झाला बॅरिस्टर
स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या आस्थापनेवर GD कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 25271 जागांसाठी मेगाभरती