लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी, दि. ६ जुलै : नागेपल्ली येथील नाल्यातून बैलबंडी द्वारे अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ८ बैलबंडया वर आज सकाळच्या सुमारास कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या नेतृत्वाखाली मंडळ अधिकारी आर.पी.सिडाम यांच्या पथकाने केली आहे.
नागेपल्ली येथील नाल्यातून अवैधरित्या रेतीची तस्करी होत असल्याची माहिती अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी यांना मिळताच त्यांनी आज सकाळी ९.३० च्या दरम्यान नागेपल्ली येथील शाहू नगर जवळ मंडळ अधीकारी व इतर महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत पाळत ठेवली असताना नागेपल्ली येथील नाल्यातून ८ बैलबंड्या रेतीची घेऊन मुख्य रस्त्याने जात असल्याचे दिसले. लागलीच त्यांना थांबवून अवैधरीत्या रेतीची वाहतूक प्रकरणी बैलबंड्या वर जप्ती ची कारवाई केली.
८ बैलबंड्या व अंदाजे २ ब्रास रेती हा मुद्देमाल अहेरी येथील तहसिल कार्यालयात जमा करण्यात आले आहे. अहेरीच्या तहसीलदारांच्या धडक कारवाईने अवैध रेती तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहे..
हे देखील वाचा :
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी दीपक सिंगला
पदाचा दुरूपयोग करणाऱ्या सभापतीला पदावरून हटवून कठोर कारवाई करण्याची वंचित बहुजन आघाडी ची मागणी
गडचिरोली जिल्ह्यात आज 18 कोरोनामुक्त, तर 24 नवीन कोरोना बाधित