भीषण अपघात! कारची ट्रक्टरला धडक, धडकेत ४ जणांचा जागीच मृत्यू तर ९ जण गंभीर

वाशिमच्या जिल्ह्यातील सोयता फाट्यानजीकची घटना.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

वाशीम, दि. १६ फेब्रुवारी : नागपूर वरून लग्न समारंभ आटोपून परत जातांना म्याक्झिमो गाडीने ट्रॅक्टरच्या उभ्या ट्रॉलीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून ९ जण गंभीर जखमी झाल्याची घटना वाशिम शहरातील सोयता फाट्यानजीक घडली आहे.  धडक इतकी जोरदार होती की, कारचा अक्षरशा चेंदामेंदा झाला आहे.

या अपघातातील मृतकांची नावे भारत गवई (३७)  पूनम गवई (३२) तर सम्राट गवई (६) असे असून हे सर्वजन वाशिम जिल्ह्यातील सावंगा जहागीर या गावातील राविवासी आहेत. तर अपघातात गंभीर जखमी झालेल्यां ९ जणांना वाशीम च्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

हे देखील वाचा : 

दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी शाळा तेथे केंद्र/ उपकेंद्राची सुविधा.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ गायक, संगीतकार बप्पी लहरी यांना श्रद्धांजली

 

lead news