दुकानाचे शटर तोडून लाखोंची चिल्लर उडवणाऱ्या टोळीला ठाणेनगर पोलिसांनी केले जेरबंद

दुकानातील १ लाख १२ हजारांची चिल्लर आणि ३३ हजारांच्या नोटा असा एकूण १ लाख ४५ हजारांचा ऐवज लुटला.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

ठाणे : ठाण्यातील घाऊक बाजारात असलेल्या टाऊन्स बाजार सुपरमार्केट या दुकानात दिनांक २३ मे रोजी रात्री ३.०० वाजताच्या सुमारास धाडसी दरोडा पडला. तीन अज्ञात चोरटयांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानातील १ लाख १२ हजारांची चिल्लर आणि ३३ हजारांच्या नोटा असा एकूण १ लाख ४५ हजारांचा ऐवज लुटला. रस्त्यावर रिक्षा उभी करून त्यांनी ही लूट पळविली.

घटनास्थळी पोहोचलेल्या ठाणेनगर पोलिसांनी वरीष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी, पोलीस निरीक्षक गुन्हे निकम साहेब, पोलीस उपनिरीक्षक सचिन बाराते यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीव्ही आणि तांत्रिक दृष्ट्या तपास करून सदर गुन्ह्यातील एका आरोपीला कोलशेत येथून अटक केली आहे.

त्यांच्याकडे कसून तपास केला असता त्याच्या इतर दोन साथीदारांना संपूर्ण लुटीसह ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. केवळ चार दिवसात ठाणेनगर पोलिसांनी हे यश संपादन केल्याने दुकानाचे मालक रमेश पांचाल यांनी त्यांचे भरभरून कौतुक केले.

हे देखील वाचा : 

धक्कादायक! अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू, प्र. कुलगुरू यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार

खुनाच्या गुन्ह्याखाली पोलीस निरीक्षकांसह 3 जणांना अटक; महाराष्ट्राचं पोलीस हादरलं

lead storythane police