अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा­या आरोपीस 25 वर्षे सश्रम कारावास व एक लाख रु. द्रव्यदंडाची शिक्षा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि ९ :गडचिरोली शहरा लगत असलेल्या गोकुलनगर येथे दिनांक 27/01/2020 रोजी फिर्यादी यांची पिडीत मुलगी वय 15 वर्षे ही नातेवाईकाच्या घरी जेवायला गेली असता, पिडीत मुलीचे नातेवाईक आरोपी शंकर सुधाकर टिंगुसले वय 34 वर्षे रा. विवेकानंद नगर, गडचिरोली याने पिडीतेला सायंकाळी 06:00 वा. दरम्यान मच्छी आणायला बाजारात जाऊ म्हणून फुस लावली व बाजारातुन परत येत असतांना कामगार सोसायटी गोकुलनगरच्या मागे पिडीतेस झाडाझुडपात जोर जबरदस्तीने नेऊन जोर जबरदस्तीने शारिरीक संबंध केले, आरोपी यांने पिडीतेला कोणाला काही सांगितले तर मी तुझ्या आईला, भावाला व तुला जादुटोना करुन मारतो अशी धमकी दिली,

त्यानंतर दिनांक 28/01/2020 रोजी सकाळी 10.00 वा. पिडीता ही दुकानात जात असतांना, आरोपी याने पिडीतेला पाहुन तुझ्या आईला काहीतरी सांगायचे आहे. इकडे ये असे बोलुन घरात कोणी नसतांना पिडीतेला घरात ओढत नेऊन, तोंड दाबुन जबरदस्तीने शारिरीक संबंध केले व कोणालाही काही सांगितले तर तुला व तुझे भावाला, आईला मारुन टाकीन अशी धमकी दिली. पुन्हा त्याच दिवशी सायंकाळी 07/00 वा. आरोपीच्या पत्नीने पिडीतेला व भावाला जेवायला बोलावून, जेवन करुन झाल्यानंतर आरोपीची पत्नी दुकानात व पिडीतेचा भाऊ घराबाहेर गेला असता, आरोपी नातेवाईक याने घरी कोणी नाही याचा फायदा घेऊन पिडीतेचा तोंड दाबुन जबरदस्तीने शारिरीक संबंंध केले व कोणालाही काही सांगितले तर तुला व तुझे भावाला, आईला मारुन टाकीन अशी धमकी दिली. फिर्यादी हे नागपूर येथे कामा निमीत्त गेले असता व लॉकडाऊन असल्याने काम वरुन दीर्घ कालावधीने पर आल्यानंतर पिडीत मुलगी ही गर्भवती आढळुन आल्याने सदर घटना पिडीतेने फिर्यादीला सांगितल्याने फिर्यादी यांनी आपले मुलीवर झालेल्या अत्याचाराची दखल घेत कायदेशिर कार्यवाही होणे करीता पोस्टे गडचिरोली येथे पिडीतेसह येऊन हकीकत सांगितली.

फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन पोस्टे गडचिरोली येथे दिनांक 05/09/2020 ला अप क्र. 401/2020 अन्वये कलम 376 (2) (एफ), (आय), (जे), 376 (3), 506 भादवी तसेच सहकलम 4,5,6 बाल लैंगीक अत्याचार अधिनियम 2012, कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन आरोपीस दिनांक 06/09/2020 रोजी अटक करुन, तपास पुर्ण करुन आरोपी विरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करुन सेशन केस क्र. 86/2020 नुसार खटला मा. सत्र न्यायालयात चालवुन फिर्यादी व वैद्यकीय पुरावा, ईतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद मा. न्यायालयाने ग्राह्र धरुन दिनांक 09/05/2024 रोजी आरोपी शंकर सुधाकार टिंगुसले वय 34 वर्षे, रा. विवेकानंदनगर, गडचिरोली यास मा. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश, श्री. उत्तम एम. मुधोळकर गडचिरोली यांनी आरोपीस कलम 376 भादवी, सहकलम 4,6 बाल लैंगीक अत्याचार अधिनियम 2012 मध्ये दोषी ठरवून 20 वर्षे सश्रम कारावास व 75 हजार रुपये दंडाची शिक्षा, कलम 506 भादवी मध्ये दोषी ठरवुन 05 वर्षे सश्रम कारावास व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम पिडीतेला देण्याचा आदेश पारित करण्यात आला.

सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील श्री. अनिल एस. प्रधान यांनी कामकाज पाहिले तसेच गुन्ह्राचा तपास म.सहा.पोलीस निरीक्षक पुनम प्रकाश गोरे पोस्टे गडचिरोली यांनी केला. तसेच संबधीत प्रकारणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकारणाची निर्गती करीता कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी कामकाज पाहिले.

हे देखील वाचा,

मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना मुंबईच्या डॅाक्टरांनी दिला विश्रांती घेण्याचा सल्ला

विरोधी पक्षनेते ना.विजय वडेट्टीवार यांची सावली तालुक्यातील भट्टीजांब येथे सांत्वनपर भेट

बालविवाह होत असल्यास त्वरीत संपर्क करण्याचे आवाहन..

जिल्हा सत्र न्यायालय गडचिरोलीपोलीस अधीक्षक गडचिरोली
Comments (0)
Add Comment