९ वर्षाच्या मुलीचा अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

रायगड, 17 जुन – उरण तालुक्यातील चिरनेर येथील ९ वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीच्या उरण पोलिसांनी मोठ्या शिताफीने मुसक्या आवळल्या आहेत.पोलीसांच्या या धाडसी कारवाई बद्दल उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते – पाटील व सदर मूलीला अपहरणाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भरत जाधव या आदिवासी बांधवांचे सामाजिक कार्यकर्त्या अलका मोकल यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी आभार व्यक्त केले आहे .

चिरनेर मध्ये ९ वर्षाच्या मुलीचा अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.मात्र भरत राम जाधव या आदिवासी वाटसरुने दाखवलेली सतर्कता आणि ९ वर्षाच्या मुलीच्या प्रसंगावधान व धाडसाने अज्ञात अपहरणकर्त्यांच्या हाताला चावा घेऊन आपली सुटका करून घेतल्याची घटना घडली होती.
याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

उरण पोलिसांनी तातडीने भरत जाधव व सदर मूलीच्या वर्णनातून आणि सी सी टिव्हीच्या फुटेज च्या माध्यमातून तपासाला सुरुवात केली होती. परिसरातील सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर एका स्वीप्ट गाडीतून आलेल्या राजेंद्र गोंधळी (३५) रा. बामण डोंगरी -पनवेल याने मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे. याआधीही त्याने नवीमुंबई हद्दीत अशाच प्रकारचा गुन्हा केला आहे.

“चिरनेर गावातील एका ९ वर्षांच्या मूलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु भरत जाधव यांच्या सतर्कतेमुळे तो प्रयत्न असफल झाला आहे.तसेच उरण पोलीसांनी तातडीने अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या इसमाला ताब्यात घेतले आहे. त्यामुळे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करत असून अशा घटना घडू नये यासाठी पालकांनी सतर्क राहावे. तसेच अशा प्रकारचा गुन्हा करणाऱ्या इसमाला कठोर शिक्षा व्हावी.”  – अलका महेंद्र मोकल व प्रणिता जयप्रकाश पाटील सामाजिक कार्यकर्त्या.

याप्रकरणी एनआरआय पोलिस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.आरोपीच्या सीसीटीव्हीच्या आधारावर मुसक्या आवळल्या असल्याची माहिती उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते-पाटील यांनी दिली.तसेच अपहरण कर्ता इसम हा आपल्या सहकाऱ्यांच्या उपस्थित कोण कोणत्या अनाधिकृत धाब्यावर दारू पिण्यासाठी बसला होता की नाही याचा ही तपास पोलीस यंत्रणा घेत आहे.

9 year girl kidnapinguran kidnaping
Comments (0)
Add Comment