गडचिरोलीत ठार करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह कुटुंबीयांच्या हवाली करणार – पोलीस अधीक्षक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. १४ नोव्हेंबर : नक्षल विरोधी अभियान अंतर्गत गडचिरोली पोलिसांनी शनिवारी केलेल्या कारवाईत मिलिंद तेलतुंबडे या कुख्यात नक्षलवाद्यासह तब्बल २६ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. ठार करण्यात आलेल्या सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास गडचिरोली पोलीस मुख्यालयात आणण्यात आले आहेत. या सर्व मृत नक्षलवाद्यांचे शवविच्छेदन करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जे कुटुंबीय मृतदेह स्वीकारणार असतील त्यांच्या हवाली करण्यात येणार आहेत. तसेच ज्यांचे कुटुंबीय मृतदेह स्वीकारणार नाहीत किंवा कुटुंबीय उपलब्ध होऊ शकणार नाहीत अशा मृतदेहांचे अंत्यविधी पोलीस प्रशासनाकडून करण्यात येणार असल्याची माहिती गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातल्या ग्यारापत्ती- मरदिनटोलाच्या जंगल परिसरात शनिवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या चकमकीत एकूण २६ नक्षल्यांना खात्मा करण्यात आला. हा परिसर महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगत असून घनदाट जंगलाने व्यापलेला आहे.त्यामुळे संपर्कासाठी मोठी अडचण येत आहे. घटनास्थळी पोलिसांकडून अजूनही सर्च ऑपरेशन सुरू आहे. तसेच या कारवाई दरम्यान जखमी झालेल्या 4 जवानांवर नागपूर येथील आरेंज सिटी हॉस्पीटल , रिसर्च सेंटर येथे उपचार सुरू आहेत.

दरम्यान, गडचिरोलीत करण्यात आलेली नक्षल विरोधी कारवाई ही आत्तापर्यंतच्या कारवाई मधील सर्वात मोठी कारवाई असून या कारवाईमुळे नक्षलवाद्याना मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. तसेच एकाच वेळी २६ नक्षलवादी ठार केल्यामुळे नक्षलवाद्यांचे मनोधर्य खच्चीकरण झाले असून नक्षलवाद अस्ताच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात केलेल्या नक्षलविरोधी यशस्वी कारवाईची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गडचिरोली पोलिसांचे अभिनंदन केले आहे

“आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे,” अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी पोलिसांचे कौतुक केले. तसेच ही कारवाई राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील उल्लेखनीय कामगिरी ठरली असून राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,हे गडचिरोली दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाई नंतर जवानांचे मनो धैर्य वाढवण्याच्या दृष्टीने आजचा गृहमंत्र्यांचा दौरा महत्वाचा मानला जात आहे.

भिमा-कोरेगांव हिंसाचाराचा सुत्रधार म्हणुन मिलींद तेलतुंबडेची नोंद

या कारवाईत ठार झालेला जहाल नक्षली मिलींद तेलतुंबडे याची भिमा-कोरेगांव हिंसाचाराचा सुत्रधार म्हणुन पोलिसांनी यापुर्वीच नोंद केली होती. तेलतुंबडे हा मुळचा महाराष्ट्र राज्यातीलच असुन त्याने ३२ वर्षापुर्वी चंद्रपूरलाअखिल महाराष्ट्र कामगार संघटनेतून कामास प्रारंभ केला होता. वेकोलीमधील अधिकाऱ्याच्या खुनानंतर तो बेपत्ता झाला होता. तो नक्षल्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य तसेच महाराष्ट्र – मध्यप्रदेश-छत्तीसगड क्षत्रिय समितीचा प्रमुख म्हणुन कार्यरत होता.नक्षली चळवळ शहरी भागात रूजवण्यात त्याचा हात होता.

मोठया संख्येने नक्षल्यांना कंठस्थान घालण्याची राज्याच्या इतिहासातील प्रथम घटना

एवढया मोठया प्रमाणात नक्षल्यांना कंठस्थान घालण्याची महाराष्ट्राच्या ईतिहासातील ही पहिलीच घटना तर देशातील दुसरी घटना आहे. छत्तीसगड मधील चकमकीत यापुर्वी झालेल्या चकमकीत ४० नक्षली ठार झाले होते. २०१८ ते २०२१ या कालावधीत गडचिरोली पोलिसांनी ७८ नक्षल्यांना कंठस्नान घातले आहे.

पोलिस-नक्षल चकमकीत ठार झालेल्या नक्षल्यांची यादी,

हे देखील वाचा ,

मोठी बातमी: गडचिरोली पोलिसांना मोठे यश; पोलीस-नक्षल चकमकीत २६ नक्षल्यांचा खात्मा

…आजही वन्यजीवाकरीता कायम वन्यजीव चिकित्सक नाही; वन प्रशासनाचे अजब धोरण…

अमरावती शहरात संचारबंदी आदेश लागू