फुलसावंगीच्या “रँचोचा” हेलिकाँप्टर ची ट्रायल घेताना दुर्दैवी मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

यवतमाळ १२ ऑगस्ट :अवघ्या 25 व्या वर्षात तरुण मुलं नोकरीच्या शोधात किंवा करिअरच्या धामधुमीत व्यस्त असतात. मात्र इब्राहिमने 3 इडियट्समधल्या रँचोप्रमाणे स्वत: काहीतरी बनवण्याचं स्वप्न पाहिलं. ते स्वप्नही सत्यात उतरलं. त्याने हेलिकॉप्टर बनवलं. मात्र तेच स्वप्न त्याचा घात करेल असं कुणालाही वाटलं नसेल

हेलिकाँप्टर तयार करणाऱ्या शेख इस्माईल चा दुर्दैवी मृत्यू यवतमाळ जिल्ह्यातील फुलसावंगी येथील शेख इस्माईल या तरुणाला घरीच हेलिकॅप्टर तयार करायचे वेड लागले होते. प्रत्यक्षात तो घरच्या कारखान्यात अलमारी ,कुलर अशा गृहपयोगी वस्तू पत्र्यापासून तयार करायचा. यातच त्याला हेलिकॉप्टर तयार करायचा छंद जडला होता .फक्त आठवी पर्यंत शिकलेल्या शेख इस्माईल ने गेली दोन वर्षे अथक प्रयत्न करून संपूर्ण हेलिकाँप्टर साकार केले .

तयार झालेल्या हेलिकॉप्टरची काल  ट्रायल घ्यायचा प्रयत्न त्याने केला . दरम्यान मागच्या बाजूचा पंखा अचानक उखडला गेला आणि त्याच्या डोक्यावर पडला . गंभीर  जखमी झालेल्या शेख इस्माईल चा यातच मृत्यू झाला . यापूर्वी शेख इस्माईल हेल्मेट घालून ट्रायल घ्यायचा , परंतु काल त्याने नेमके हेल्मेट घातले नव्हते.त्यामुळेच  त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली आणि यातच त्याचा मृत्यू झाला.lशेख इस्माईल  च्या  दुर्दैवी निधनाबद्दल सर्वत्र शोक व्यक्त केल्या जात आहे.

हे देखील वाचा :

अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी! लग्नाच्या सहाव्या महिन्यातच तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

 

 

17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याच्या काढलेल्या आदेशाला सरकारने दिली स्थगिती, टास्क फोर्सच्या बैठकीनंतरघेतला निर्णय

 

राज्यात शिख समाजासाठी आनंद विवाह नोंदणी कायदा लागू असून संबंधीत शासकीय विभागांनी अंमलबजावणी करावी. अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक

fulsawangihelicopteraccident