लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
चंद्रपूर, दि. ४ मार्च : चंद्रपूरच्या रामनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. चंद्रपूर शहरातील विवेकनगर भागातील प्रदीप चेपूरवार यांच्या घरी ही चोरी झाली होती. गजानन महाराज प्रगट दिनासाठी परिवाराने पूजेसाठी वापरले जाणारे चांदीची भांडी-मूर्ती-ताटे आदी साहित्य बाहेर काढले होते. रात्री उशिरा घरातच काढून ठेवलेल्या साहित्याची घरातील ग्रील उचकटून चोरी झाली.
सकाळी चोरीची तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपास चक्रे फिरविली. पोलिसांनी बीड आणि जालना येथून आगामीर खान आणि जमीर शेख या आरोपीना चारचाकीसह अटक केली.
या चोरट्यांनी मराठवाडा-विदर्भासह, मध्यप्रदेश-छत्तीसगड येथेही या चोरट्यांनी दरोडे घातल्याचे तपासात उघड झाले आहे. चोरट्यांची आंतरराज्यीय टोळी या घटनेने उजेडात आली.
हे देखील वाचा :
विधानपरिषद अधिवेशन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना विलिनीकरणाचे फायदे द्या