बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार. ब्रह्मपुरी तालुक्यातील शिरगाव डोरली येथील घटना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

ब्रम्हपुरी ०७डिसेंबर :- तालुक्यात सध्या बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. चिचगाव (डोर्ली) येथे शेतातिल काम आटपून वापस येत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अगदी गाँवालगत असलेल्या पाण्याच्या टाकी जवळ मृतक सावित्राबाई श्रीराम ठेंगरी (65) याच्यावर हल्ला करुण जागीच ठार केले.गावातील नागरिकानी आरडा ओरड केल्याने बिबटयाने जंगलात धूम ठोकली असली तरी गावात दहशतीचे वातवारण निर्माण झाले आहे.


ब्रह्मपुरी तालुक्यातील चिचगांव (दोर्ली) हे गाव घनदाट जंगल व्याप्त आहे.या ठिकाणी काही महिन्यापासुन बिबटयाचे हालचाली दिसत असून सध्या शेतीचे काम सुरु आहे.त्यासाठी महिला ,पुरुष शेतमजूरी च्या कामावर जात असतात मात्र सध्या बिबटया अचानक हल्ला मानवी जीवावर होत असल्याने गावात बिबटयाची दहशत निर्माण झाली आहे. याच आठवड्यात डोर्ली या गावात एका महिलेला बिबटया ठार केले असल्याने बिबटया हल्यात दोघांना जीवास मुकावे लागले आहे.गावकार्यानी वनविभागास माहिती दिली असून घटना स्थळी दाखल झाल्याची माहिती समोर आली असली तरी गावकार्यांच्या माहिती नुसार दोनहीँ घटनेटिल हल्ला करणारा बिबटया एकच असुन पुन्हा मानवी हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे वनविभागाने वेळीच लक्ष घालून बिट्याचे बंदोबस्त करावे अन्यथा मोठे आंदोलन उभे करावे लागणार अशी नगरिकात जोरदार चर्च्या आहे.