लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, दि.19 एप्रिल : प्रकल्प कार्यालय एकादिवासी वित्मिक आकास प्रकल्प अहेरी, जि.गडचिरोली यांचे कार्यक्षेत्रा अंतर्गत अहेरी,मुलचेरा,सिरोंचा,जे तीन तालुके येत असून सदर तालुक्यातील इय्यता 6वी, 7,8,9 वी मध्ये प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता एकलव्य रेसिंडेसियल स्कुल मध्ये प्रवशे घेण्याबाबत इच्छुक पालकांनी विहित नमुन्यातील अर्ज प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी ,व शासकीय/अनुदानित आश्रमशाळा/आदिवासी मुला/मुलींचे वसतीगृह,येथून विनामुल्य अर्ज प्राप्त करुन 10 मे 2022 पर्यंत सादर करावे. इय्यता 6 वी ते 9 वी प्रवेश मिळण्याकरीता अटी व शर्ती पुढील नमुद केल्याप्रमाणे राहतील.
योजनेचा लाभ घेऊ इच्छिनारा विद्यार्थी अनुसूचित जमातीच्या असावा, पालकांचे सक्षम अधिकाऱ्यांने दिलेले अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत सादर करावी. कुटूंबाचे सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न सहा लक्ष इतके मर्यादित राहील. पालक दारिद्रय रेषेखाली असेल तर त्यासंबंधीचा दाखला. शैक्षणिक सत्र 2021-22 मध्ये इयत्ता 5 वी तसेतच 6 वी ते 8 वीचे शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीतच्या विद्यार्थ्यांचे निवड स्पर्धा परिक्षेचा माध्यमातून करण्यात येईल व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात येईल. खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश कोणत्याही वेळेस रद्द करण्यात येईल. निवड झालेल्या विद्यार्थ्याला एकदा शाळा निश्चित झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत पालकांच्या व पाल्यांच्या विनंतीनुसार शाळा बदलता येणार नाही.
याबाबतत पालकांनी हमीपत्र सादर करावे.आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी 5 टक्के जागा आरक्षित राहतील तसेच अनुसूचित जमातीच्या अपंग विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के जागा आरक्षित राहतील असे प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी यांनी कळविले आहे.
हे देखील वाचा :
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे पुन्हा सेवेत रुजू; आजारपणातून बाहेर पडताच मंत्रालयात दाखल