कोविड-19 मध्ये अनाथ/एकपालक झालेल्या बालकांना शालेय शुल्क, वसतिगृह शुल्क, शैक्षणिक साहित्य खरेदी करीता अर्ज आंमत्रित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि.11 फेब्रुवारी : गडचिरोली जिल्हयातील जनतेला कळविण्यात येते की कोविड-19 संसर्गामुळे जिल्हयात अनेक बालकांवर अनाथ /एकपालक होण्याची वेळ आलेली आहे. कोविड-19 मुळे अनाथ/एकपालक झालेल्या बालकांना सर्वोच न्यायालयाकडून बाल न्यान निधीमध्ये रक्कम प्राप्त झालेली आहे. तरी कोविड-19 मध्ये अनाथ/एकपालक झालेल्या बालकांना शालेय शुल्क,वसतिगृह शुल्क,शैक्षणीक साहित्य खरेदी या उद्देशासाठी निधीची गरज असल्यास या करीता आपल्या तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे कडे अर्ज सादर करावा. अर्जाचा नमुना आपल्या तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय येथे उपलब्ध आहे.

अधिकच्या माहिती करीता आपल्या तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय तथा सचिव तालुका समन्वय समिती (मिशन वात्सल्य) किंवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बँरेक क्रमांक 1, खोली क्रमांक 26,27 कलेक्टर कॉम्पलेक्स गडचिरोली दुरध्वनी क्र.07132-222645 येथे संपर्क साधावा असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गडचिरोली प्रकाश भांदककर यांनी कळविले आहे.

हे देखील वाचा :

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज आंमत्रित

चंद्रपूरात पहिल्या रुग्णाला किमो थेरेपी द्वारे उपचार

जलवायु परिवर्तन कमी करण्यासाठी ‘सौर पुरुष’ निघाला देश-विदेशाच्या भ्रमंतीवर!

 

 

lead news