विद्यापीठात साजरा होणार कला व क्रीडा महोत्सव

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि.१७ फेब्रुवारी : गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील महाविद्यालये व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने विद्यापीठातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन संध्याकाळी ५ वासता विद्यापीठ सभागृहात करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, तर प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे ,संचालक शारीरिक क्रिडा विभाग डॉ. अनिता लोखंडे यांची उपस्थिती होती.

२६ व २७ फेब्रुवारी रोजी गोंडवाना विद्यापीठाच्या परिसरात कला व क्रीडा महोत्सव साजरा होणार आहे .यासंदर्भातल्या नियोजनाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील सर्व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी आणि गोंडवाना विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सुप्त कलागुणांना चालना देण्याच्या उद्देशाने या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

येत्या २६ व २७ फेब्रुवारी ला विद्यापीठाच्या परिसरात क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. त्यासाठी पूर्वतयारी सुरू झाली असून विविध महाविद्यालयातील जवळपास २०० आणि विद्यापीठातील१५० असे एकुण३५० शिक्षकेतर कर्मचारी आपल्या सांस्कृतिक कलेचे सादरीकरण करणार आहे.

विद्यापीठ आणि महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचार्‍यांसाठी कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करणारे गोंडवाना विद्यापीठ हे महाराष्ट्र तील पहिलेच विद्यापीठ आहे. त्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कला व क्रीडा महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी केले आहे.

हे देखील वाचा : 

अबब! प्रियसी साठी चोरल्या तब्बल १५ दुचाक्या; दुचाकी चोरून पुरवीत होते प्रियसी चे लाड

कोरड्या विहिरीत पडलेल्या बिबट्याची अखेर वन विभागाने केली सुटका..

धक्कादायक! स्वतःचे सरण रचून शेतकऱ्याने केली आत्महत्या…

gondwana universitylead news