कै. राजे सत्यवाणराव महाराज यांची जयंती साजरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आल्लापल्ली, दि. ७ डिसेंबर : स्थानिक राजे धर्मराव कला वाणिज्य महाविद्यालय, सांस्कृतिक विभागातर्फे अहेरी संस्थानाचे माजी राजे, कैलासवासी श्रीमंत सत्यवानराव महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

याप्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. यू. टिपले, प्रमुख पाहुणे डॉ. नीरज खोब्रागडे, डॉ. रामदास कुबडे तसेच प्रा. राजूरकर, प्रा.ढवळे प्रा. नन्नावरे, प्रा. कू. मद्दीवार, प्रा. कू. घसगंटीवार उपस्थित होते.

अध्यक्ष तसेच प्रमुख पाहुण्यांचे हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात येवून माल्यार्पण करण्यात आले. अध्यक्ष महोदय यांनी आपल्या भाषणात राजे सत्यवाणराव यांनी सामजिक,राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा आढावा घेतला.

कार्यक्रमाचे संचालन प्रा.प्रतिमा सूर्यवंशी  तर आभार प्रदर्शन प्रा.कु.सोनाली गंपावार यांनी केले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रा.डोंगरे,प्रा.सोनुले, होशान वासेकर,देविदास देवाडकर,प्रदीप तलांडे यांचे विशेष सहकार्य लाभले.

हे देखील वाचा : 

नक्षल सप्ताहाचा केला निषेध…

नगरपंचायतीच्या निवडणूकीसाठी उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ – जिल्हाधिकारी संजय मीना यांची माहिती

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुकांना स्थगिती – राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांची माहिती

lead news