गडचिरोली येथे 27 जुन ला स्पर्धा परीक्षेचे मोफत मार्गदर्शन शिबीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली,  दि. 23 जून :  गडचिरोली जिल्हयातील ध्येयनिष्ठ तरुण जे प्रशासकीय अधिकारी होण्याची स्वप्न मनात बाळगून आहेत. परंतु योग्य मार्गदर्शनाची उणीव भासत आहे व ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी योग्य मार्ग दिसेनासे झाले आहे.

अशा तरुणांसाठी महाराष्ट्र शासन, आदिवासी विकास विभाग, आयुक्तालय, आदिवासी विकास नाशिक अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली तर्फे UPSC/MPSC मोफत मार्गदर्शन शिबीराचे आयोजन शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, गडचिरोली येथे 27 जुन 2021 रोजी दुपारी 12.15 वाजता आयोजित कलेले आहे.

सदर शिबीरातील विद्यार्थ्यांना आशीष येरेकर (IAS) सहाय्यक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली, तसेच नरेंद्र बेंबरे मुख्याधिकारी नगर पंचायत धानोरा हे मार्गदर्शन करणार आहेत.

तरी ईच्छुक तरुणांनी लाभ घ्यावा असे आशिष येरेकर , भा.प्र.से. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली यांनी कळविले आहे. कोरोनाच्या प्रतिबंधक नियमांच्या पालन करिता जे प्रथम येतील त्यांना प्राधान्य दिल्या जाणार आहे.

हे देखील वाचा  :

महाविद्यालयीन युवकांना राजे धर्मराव महाविद्यालयाकडून रोजगाराची दूसरी संधी

गडचिरोली जिल्ह्यात आज एका मृत्युसह 11 कोरोनामुक्त तर 29 नवीन कोरोना बाधित

आणीबाणी काळात तुरुंगवास भोगलेल्या कार्यकर्त्यांचा २५ जून ला सन्मान

 

Competitive Exam free guidance shibirlead story