श्रीधर दुग्गीरालापाठी यांची पत्रमहर्षी स्व. मोहनलाल बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कारासाठी निवड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अहेरी, दि. २५ डिसेंबर : नक्षलवाद्यांचे माहेरघर म्हणून समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथील एका दैनिक वृत्तपत्राचे प्रतिनिधी व राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी श्रीधर दुग्गीरालापाठी यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व दैनिक मराठवाडा साथी यांच्यावतीने देण्यात येणारा पत्रमहर्षी स्वर्गीय मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी या पुरस्काराने गौरविण्यात येते.

श्रीधर दुग्गीरालापाठी यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून कमलापूर परिसरातील अनेक समस्या मांडल्या आहेत.सामाजिक कार्यात नेहमी त्यांचा सहभाग असतो. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पूर्व विदर्भातुन त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली असल्याने
राज्य पत्रकार संघ अहेरी तालुका तर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.

lead newsshirdhar duggiralapati