महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या तारखा जाहीर; तब्बल ४०,००० शिक्षकांच्या जागांसाठी होणार भरती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, २१ जुलै :  राज्यात लवकरच शिक्षकांच्या तब्बल ४०,००० जागांसाठी भरती होणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून मान्यता देणार आहे. या परीक्षांचा कालावधी आता निश्चित करण्यात आला आहे.

राज्याचा शिक्षण विभागाकडून शिक्षक पात्रता परीक्षेसाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे आता ही परीक्षा १५ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत घेतली जाणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (MAHA TET Exam) लवकरच अर्ज करण्याचं पोर्टल सुरु होणार आहे. राज्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील २७ हजार आणि माध्यमिक शाळेतील १३ हजार अशी एकूण ४० हजार शिक्षकांची पदं रिक्त आहेत. पहिल्या टप्प्यात ६१०० जागा भरण्यात येणार आहेत.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून ही परीक्षालांबणीवर गेली होती. मात्र या वर्षी या परीक्षेला मान्यता देण्यात आली आहे. याआधी २०१८-१९ या शैक्षणिक विरहात ही परीक्षा घेण्यात आली होती.

गेल्या दोन वर्षांपासून ही परीक्षा रखडल्यामुळे लाखो उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या वेळच्या तुलनेत यावर्षी दुप्पट विद्यार्थी परीक्षेला बसतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

हे देखील वाचा :

धक्कादायक! सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल होताच केली आत्महत्या

भू-गटार योजनेतील दुर्गंधीयुक्त पाणी अनेकांच्या घरात; जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना घेराव

धक्कादायक!! पैश्याच्या वादातून मुलाने केली आईची हत्या!

 

lead storymahatet