“एकत्र वाटचाल!.चांगल्या जीवनाकडे!”लॉयड्सतर्फे कोनसरी येथील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी प्रेरणादायी कार्यशाळेचा भव्य प्रारंभ

जीवनात प्रेरणा, समज, संवाद आणि संतुलन असणं तेवढंच महत्त्वाचं आहे, जितकं कामगिरीचं!” – या विचारातून Lloyds Metals & Energy Ltd. (LMEL) ने कोनसरी गावातील कर्मचारी आणि त्यांच्या पती-पत्नींसाठी एक प्रेरणादायी १० दिवसांची कार्यशाळा आयोजित केली आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली,दि. २९ मे : कार्यालयीन कामकाजात मन लावून कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे खरे जीवन त्यांच्या कुटुंबीयांमध्ये फुलते. या जीवनात प्रेरणा, समज, संवाद आणि संतुलन असणं तेवढंच महत्त्वाचं आहे, जितकं कामगिरीचं!” – या विचारातून Lloyds Metals & Energy Ltd. (LMEL) ने कोनसरी गावातील कर्मचारी आणि त्यांच्या पती-पत्नींसाठी एक प्रेरणादायी १० दिवसांची कार्यशाळा आयोजित केली आहे.

ही कार्यशाळा कोनसरी येथील ‘लॉयड्स कौशल्य विकास व प्रशिक्षण केंद्रात’ बुधवारी एका समारंभपूर्वक उद्घाटनाने सुरू झाली. LMEL चे व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. प्रभाकरन यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची मूळ कल्पना साकार झाली असून, जगप्रसिद्ध कॉर्पोरेट प्रशिक्षक श्री. गोपी गिलबिले आणि श्रीमती अनिता गिलबिले यांचे या कार्यशाळेच्या मार्गदर्शनासाठी विशेष योगदान आहे.

सामाजिक जबाबदारीची प्रेरणादायी उंची..

कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात LMEL चे वरिष्ठ अधिकारी, प्रशिक्षक मंडळी, तसेच कोनसरीतील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा उत्स्फूर्त सहभाग होता.अधिकाऱ्यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “सर्व कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या जीवनसाथीने हे सत्र केवळ माहिती घेण्यासाठी नव्हे, तर आपले जीवन अधिक आनंददायी, समृद्ध आणि संतुलित करण्यासाठी उपयोगात आणावे.”

जमीन संपादन, भरपाई, रोजगाराच्या संधी यासह कंपनीने घेतलेल्या सामाजिक पुढाकारांबाबतही यावेळी सविस्तर माहिती देण्यात आली. “फक्त आर्थिक समृद्धी नव्हे, तर मानसिक, कौटुंबिक आणि सामाजिक आरोग्यसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे,” असे नमूद करत आर्थिक नियोजन, व्यसनमुक्ती, आरोग्य आणि कुटुंबातील संवाद या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन करण्यात आले.

गिलबिले दाम्पत्याची जादूदार सत्रं…

श्री. गोपी आणि श्रीमती अनिता गिलबिले यांनी दिलेल्या मार्गदर्शनाने कार्यशाळेला खरी ऊर्जा मिळाली. त्यांच्या प्रेरणादायी, विनोदी आणि अनुभवसंपन्न सत्रांमध्ये खालील मुद्द्यांवर भर देण्यात आला.

पती-पत्नीमधील सौहार्द आणि संवाद,काम व व्यक्तिगत आयुष्यातील संतुलन,आर्थिक नियोजन व बचतीची सवय,मुलांचे संगोपन व शिक्षण, व्यसनमुक्त जीवनशैली चांगले आरोग्य, स्वच्छता आणि सकस आहार,आत्मविश्वास वाढवणे, उद्दिष्ट ठरवणे,कामाच्या ठिकाणी नियमितता आणि औद्योगिक सुरक्षा सर्व सत्रांमध्ये सक्रिय सहभाग, प्रश्नोत्तरं, समूहचर्चा आणि रचनात्मक उपक्रमांमुळे सहभागींना यामधून आत्मपरीक्षण आणि सकारात्मक बदलाची दिशा मिळाली.

कोनसरीत बदलाची नांदी…

या कार्यशाळेच्या माध्यमातून LMEL कोनसरीत केवळ रोजगार देणारी संस्था राहिली नाही, तर एक सामाजिक बांधिलकी जपणारा घटक म्हणून पुढे येत आहे.कार्यशाळेतील सहभागींनी तीव्रतेने अनुभवले की, कंपनीचा कर्मचारी म्हणून त्यांचे कुटुंबही विकासाच्या प्रक्रियेचा एक भाग बनले आहे.”हे सत्र आमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्यात अमूल्य ठरणार आहे,” असे भावना काही सहभागी पती-पत्नींनी व्यक्त केल्या.

पुढील टप्प्यात…

या उपक्रमाचा पुढचा टप्पा अजून अधिक व्यापक आहे. LMEL पुढील काही दिवसांत कोनसरीतील कर्मचाऱ्यांच्या इतर तुकड्यांसाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी अशाच प्रेरणादायी कार्यशाळा आयोजित करणार आहे.हे सत्र केवळ प्रशिक्षण न राहता, गावाच्या सामाजिक मानसिकतेत सकारात्मक बदल घडवणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

"सर्व कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या जीवनसाथीने हे सत्र केवळ माहिती घेण्यासाठी नव्हेतर आपले जीवन अधिक आनंददायीसमृद्ध आणि संतुलित करण्यासाठी उपयोगात आणावे."