आलापल्ली येथील कन्या शाळेत राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अहेरी, दि. ११ नोव्हेंबर : भारत सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या वतीने तसेच राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्यामार्फत दर तीन वर्षांनी राष्ट्रीय संपादणूक चाचणी चे आयोजन केले जाते. त्यानुसार आज शुक्रवार १२ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण आलापल्ली येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र कन्या शाळा येथे घेण्यात आले.

या वेळी निरीक्षक म्हणून क्षेत्रीय अन्वेषक रमेश कुसनाके नवघडे बंजारी कन्या शाळेचे मुख्याध्यापक मुकुंदराव सडमेक यांची उपस्थिती होती.

इयत्ता तिसरी पाचवी आठवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या चाचणीसाठी जिल्हाभरातील सर्व व्यवस्थापनाच्या एकूण १९८९ शाळा पैकी १८९ शाळांची निवड करण्यात आली आहे. या चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण होणार आहे.

या चाचणीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी ओ.एम.आर. पद्धतीने होणार आहे. त्यातून प्रत्येक तालुक्याची तुलना होणार असून कोणता तालुका कोणत्या विषयात मागे किंवा पुढे आहे. म्हणजे कोणत्या तालुक्यात काय करत आहे हे समजणार आहे. हे समजल्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत कृती कार्यक्रम तयार केला जाणार आहे. त्यानंतर सतत तीन वर्षे त्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे शाळांना क्रमप्राप्त ठरणार आहे हा राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणीचा मूळ गाभा आहे. यावेळी अहेरी तालुक्यातील २३ केंद्रावर ही चाचणी घेतली गेली.

या सर्वेक्षण कार्यक्रमात कोंडा सर, शिक्षिका रामटेके, दहागांवकर, रिघनाथे यांनी सहकार्य केले.

हे देखील वाचा :

चॉकलेटचे आमिष दाखवत चिमुरडीचा विनयभंग !

प्रवासात महिलांच्या दागिने आणि पर्स लंपास करणाऱ्या एका टोळीला चंद्रपुरात अटक

चोरी करणाऱ्या अंतरराज्य टोळीला अटक!

 

lead newsMukund SadmekZP Kanya Schol Alapalli