महा अंनिस शाखा गडचिरोली येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस संपन्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली :  महा अंनिस शाखा गडचिरोली चे वतीने आरमोरी रोड वरील महा अंनिस कार्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त चमत्कार सादरीकरण व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली.

अंंधश्रद्धा घालविण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करावा लागेल. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे तरी काय तर घटनेमागील कार्यकारण भाव जाणून घेणे. ही बाब जी व्यक्ती समजून घेऊन आचरण करतील ती व्यक्ती अंंधश्रद्धेवर मात केल्या शिवाय राहणार नाही असे मत महा अंनिस चे जेष्ठ कार्यकर्ते विलास निंबोरकर यांनी व्यक्त केले.
बुवाबाजी संघर्ष प्रमुख प्रशांत नैताम यांनी महा अंनिस ची पंचसूत्री विस्तृतपणे विविध उदाहरणे देऊन विषद केली. प्रधान सचिव विलास पारखी यांनी विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालताना काही लोक आध्यात्माला शुद्धाचरण, नितीमत्तेचे पालन करून जीवन व्यतीत करणे असे असताना नाहक दैववाद पुढे करतात आणि अंंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम करतात व अशिक्षित, अज्ञानी, भोळी भाबडी जनता अशा भुलथापांना बळी पडतात म्हणून ते थोपवायचे असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेणे गरजेचे आहे असे मत प्रतिपादीत केले.
तसेच भोजराज कानेकर, प्रमोद राऊत व अरूण भोसले यांनी देखील मोलाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर विलास पारखी यांनी मंत्राच्या सहाय्याने हातावरील नारळ कसा उठून बसतो ते प्रयोग करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले व त्यानंतर त्या मागील कारणमीमांसा विषद केली.
या कार्यक्रमाचे संचालन गोविंदराव ब्राम्हणवाडे तर आभारप्रदर्शन दामोधर ऊप्परवार यांनी केले. हम होंगे कामयाब एक दिन या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी विवेक मून, सौ ग्रिष्मा मून, सुधाकर दुधबावरे, ज्योती भोसले, प्रियंका निंबोरकर आदी उपस्थित होते.
हे देखील वाचा : 
रशिया-युक्रेन युद्धामुळे होळीपुर्वीच तेलाचा उडाला भडका
सैलानी बाबांची यात्रा सलग तिसऱ्या वर्षी ही रद्द..

नाशिक जिल्ह्यातून किसान रेल्वे आता आठवड्यातून चार दिवस धावणार… 

 

 

lead news