अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिलीत प्रवेशाबाबत सूचना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि.04 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड जि. गडचिरोली या प्रकल्प कार्यालयांतर्गत सन 2025-26 या वर्षाकरिता अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिलीत प्रवेश देण्यासाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी 2025 आहे.

अर्जासोबत विद्यार्थ्यांचे नजीकच्या काळातील दोन पासफोर्ट साईज फोटो, पालकाचे उत्पनाचे प्रमाणपत्र 1 लक्षापेक्षा जास्त नसावे(तहसिलदार), पालकाचे/विद्यार्थ्यांचे रहिवासी प्रमाणपत्र, पालकाचे/विद्यार्थ्यांचे जातीचे प्रमाणपत्र, (तहसिलदार/उपविभागीय अधिकारी), जन्म प्रमाणपत्र (अंगणवाडी/ ग्रामसेवक), दारिद्रय रेषेखाली असल्यास ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र, महिला पालक विधवा/घटस्फोटित/निराधार/परितक्त्या असल्यास ग्रामपंचायतीचा प्रमाणपत्र, विद्यार्थ्याचे आधार कार्ड झेरॉक्स प्रत(आधार कार्ड पडताळणी केलेला), इत्यादी कागदपत्रे गरजेची आहेत.

इयत्ता पहिलीत प्रवेश घेऊ इच्छिणा-या अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्याकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आलेले असून सदर प्रवेश अर्ज भामरागड व एटापल्ली तालुक्यातील शासकीय आश्रम शाळा, अनुदानित आश्रम शाळा, प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड, व सुविधा केंद्र, शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह,एटापल्ली येथे उपलब्ध राहील व परिपूर्ण भरलेला प्रवेश अर्जासोबत कागदपत्रे जोडून उपरोक्त ठिकाणी जमा करण्यात यावे. असे आवाहन नमन गोयल (भा.प्र.से.) प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड जि. गडचिरोली यांनी केले आहे.

हे ही वाचा,

सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या योगदानामुळेच महिला प्रगतीपथावर – प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर

‘पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 2000 रुपये;

भारतीय नारी सोनं ठेवणीच्या बाबतीत संपूर्ण जगात भारी!