गोंडवाना विद्यापीठात एकदिवसीय व्याख्यानाचे आयोजन

प्रख्यात आंबेडकरी विचारवंत तथा वरिष्ठ पत्रकार, प्रा. रणजित मेश्राम, यांचा "डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारत" या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली,दि ४ : दि. ६ डिसेंबर २०२३ रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने दुपारी १२.३० वाजता, विद्यापीठ सभागृहात व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे, नागपूर येथिल प्रख्यात आंबेडकरी विचारवंत तथा वरिष्ठ पत्रकार, प्रा. रणजित मेश्राम, यांचा “डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारत” या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण तसेच
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ. दिलीप बारसागडे यांनी केले आहे.

गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अनिल हिरेखणप्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळेडॉ. प्रशांत बोकारेप्रा. रणजित मेश्राम