पोस्ट मॅट्रीक स्कॉलरशिप योजना शिष्यवृत्तीसाठी डीबीटीवर 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. 03 जानेवारी : अनुसूचित जाती व नवबोद्ध घटकातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोस्ट मॅट्रीक स्कॉलरशिप योजना 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी महाडिबीटी पोर्टलवर विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजनांच्या अर्जासाठी 31 जानेवारी अंतिम मुदत होती. अनेक विद्यार्थ्यांची महापोर्टलवर अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने १५ फेब्रुवारी पर्यंत मुदत वाढ देण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

पात्र विद्यार्थ्यांनी http://mahadbtmahait.gmail.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरावे. शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी या सवलतीचा लाभ घेण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. उच्च शिक्षणातील काही विषयातील प्रवेश प्रक्रिया व राऊंड सुरू असल्याने विद्यार्थ्यांना पोस्ट मॅट्रीकसाठी अर्ज करणे व पूर्वीच्या अर्जाचे नूतनीकरण करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या योजना, अर्ज करण्याचे निकष व अटी सदर संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विहित वेळेत अर्ज सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सिध्दार्थ गायकवाड यांनी केले आहे.

हे देखील वाचा : 

परळी – बीड – नगर रेल्वे मार्गावर प्रवाशी घेऊन रेल्वेचे चाचणी

जिल्ह्यात कोरोनाने एका महिलेचा मृत्यू, नवीन 158 कोरोनाबाधित तर 327 कोरोनामुक्त 

“या” बिल्डरच्या बॉडिगार्ड्सकडून शेतकऱ्याला बेदम मारहाण

 

 

lead news