६ वर्षाच्या चिमुकलीला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे शिवांगी काळे ला प्रमाणपत्र प्रदान केले.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

जळगाव, दि. २४ जानेवारी : जळगाव येथील शिवांगी काळे (६ वर्ष) हिला ‘वीरता श्रेणी’ मध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे शिवांगी काळे ला प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी उपस्थित होत्या. आपल्या आईला विजेचा धक्का लागला असतांना प्रसंगावधान राखून तिचे प्राण वाचविणार्‍या जळगाव येथील शिवांगी काळे या चिमुकललीला आज प्रधानमंत्री बालशक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले.

आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते देशातील बाल शौर्य विजेच्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. कोरोनाच्या आपत्तीमुळे हा कार्यक्रम ऑनलाईन या प्रकारात घेण्यात आला. यात जळगाव येथील शिवांगी काळे या ६ वर्षाच्या बालिकेचा समावेश आहे. ५ जानेवारी २०२० रोजी शिवांगी आई घरात बाथरूममध्ये असतांना त्यांना विजेच्या हिटरचा शॉक लागला. यामुळे त्यांच्या तोंडून किंचाळी बाहेर पडले. बाथरूमच्या बाहेर तेव्हा पाच वर्षाची असणारी शिवांगी ही दोन वर्षाच्या आपल्या बहिणीसह होती. या दोन्ही बहिणी आईची अवस्था पाहून घाबरल्या. मात्र शिवांगीने प्रसंगावधान राखून आईला स्पर्श न करता हिटरचे स्वीच बंद केले. यातून तिने आईचे प्राण तर वाचवलेच. पण शिवांगी ने स्वतः आणि बहिणीला देखील दुर्घटनेपासून वाचविले.

आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह शिवांगी आणि तिच्या पालकांनी पंतप्रधानांशी संवाद साधला. या कार्यक्रमात तिला गौरविण्यात आले. या माध्यमातून जिल्ह्याचा नावलौकीक उंचावला आहे.

हे देखील वाचा : 

कोरोना काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक संशमनी वटी गोळ्यांचे पालघर येथे मोफत वाटप

आठ दिवसांपूर्वी बनलेला रस्ता चक्क हातानेच उकरला जातोय!

 

lead news