लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : आदिवासी गौरव यात्रेमध्ये सहभागी झालेले सर्व प्राध्यापक सरोदवादक विजया रोहित कांबळे यांच्या सरोद स्वरांनी मंत्रमुग्ध झाले.
महाराष्ट्र राज्य प्राध्यापक विकास अकादमी व गोंडवाना विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने प्राध्यापकांसाठी आदिवासी गौरव यात्रा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक सहभागी झाले आहेत.
विजया कांबळे यांनी सरोद वादनातून भावगीते, भक्तिगीते, गझल व विविध रागांचे सादरीकरण केले. अभिजित राठोड यांनी तबला साथ केली.
आदिवासी गौरव यात्रेच्या समन्वयक डॉ. प्रिया गेडाम यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.