मोबाईल वापराने शालेय विद्यार्थी पोहचत आहेत अश्लीलतेच्या जाळयात

ओंनलाईन शिक्षणाने मुले मोबाईल मध्ये व्यस्त .

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

नागपूर डेस्क दि.२३ जानेवारी :- आधुनिकतेच्या युगात संपर्क माध्यम म्हणून मोबाईलचा वापर सर्वत्र होतांना दीसून येत. वयोवृद्धापासून शालेय विद्यार्थापर्यंत मोबाईल पोहचला आहे. कोरोनाच्या काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यास सुरु झाला आणि विद्यार्थांकडून मोबाईलचा वापर तासनतास होतांना दिसून येत आहे. यात हे शालेय विद्यार्थी कळतनकळत या मोबाईलद्वारे अश्लील चित्रफितीच्या जाळ्यात ओढत असल्याने विद्यार्थ्यांचा मनावर विपरीत परिणाम होतांना दिसून येत आहे.

इंटरनेट सेवा ही दुधारी तलवार आहे. या इंटरनेटमुळे संपूर्ण जग जवळ झाले आहे. जगातील माहिती क्षणाधार्त मिळत असतात एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा असो वा इतर कोणत्याही परीक्षेची तयारी यासाठी ही इंटरनेट सेवा अतिशय उपयुक्त आहे. परंतु शालेय विद्यार्थांकडून इंटरनेटचा दुरुपयोग होत असल्याने शिक्षकांसह पालकांची डोकेदुखी वाढली आहे. मुले तासनतास अभ्यासाच्या नावाखाली मोबाईल हाताळतांना दिसून येतात, मात्र यामुळे कळतनकळत ही मुले वापर करणारी ५० टक्के मुले इंटरनेटवर सेक्सी दृष्य पाहत असतात.

बऱ्याच वेळा उत्तेजक, हिसंक,सेक्सी दृश्य पहात असल्याने याचा प्रतिकूल परिणाम बालकांच्या मनावर होऊन मुलांच्या वागणुकीत बदल होतो. यामुळे बालकांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग बंद असल्याने ग्रामीण भागातील मुलांचे अभ्यासाकडे कायमचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. तर शहरी भागातील सुज्ञ पालकांची मुले कशीबशी अभ्यासात मग्न असतात. कोरोनाच्या भयगंडामुळे प्राथमिक शाळांचे वर्ग सुरु न झाल्याने पालकांची चिंता वाढली आहे.

३५ ते ४० टक्के मुले इंटरनेटवर शैक्षणिक ज्ञानवर्धक माहिती शोधण्यात मग्न असतात. मात्र कळत नकळत बालके सेक्सी दृश्यांकडे आकर्षित होतात. पाश्चात्य देशात असणारी अश्लीलता सर्वत्र पसरत आहे. बालकांना मोबाईल वापरास पालकांनी बंधने घातली तर प्रसंगी मुले आक्रमक होतात. त्यामुळे पालक मुलांना मोबाईल वापरास मनाई करीत नाही. मोबाईल मधील वाईट गोष्टींचा वापर शालेय विद्यार्थ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढतच आहे.