शैक्षणिक प्रवास संपला तरी आयुष्याचा प्रवास सुरूच राहणार – डॉ. श्रीराम कावळे

पदव्युत्तर शैक्षणिक इंग्रजी विभागातील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात प्रतिपादन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. ९ जून :  जीवनात अनेक गोष्टींची आपल्याला परीक्षा द्यावी लागते. शैक्षणिक प्रवास संपला तरी आयुष्याचा खरा प्रवास सुरूच राहणार तसेच आयुष्यात सफल होण्यासाठी सचोटीने कार्य करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांनी केले. पदव्युत्तर शैक्षणिक इंग्रजी विभागाच्यावतीने एम. ए. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता .त्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

प्रमुख वक्ता म्हणून बोलतांना प्रा. देवदत्त तारे म्हणाले, निरोप समारंभ हा विद्यापीठ शिक्षणाचा शेवट नसून नवीन शैक्षणिक अध्यायाची सुरुवात आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या विभागाप्रती दायित्व असू द्यावे व विभागाचे प्रतिनिधी म्हणून समाजात वावरावे. स्वतःचे ज्ञान कायम अद्ययावत करत राहावे, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. विवेक जोशी, डॉ. वैभव मसराम, डॉ. शिल्पा आठवले, डॉ. प्रमोद जावरे व पदव्युत्तर शैक्षणिक इंग्रजी विभागाचे विद्यार्थी संशोधक उपस्थित होते.

हे देखील वाचा : 

आद्यक्रांतिकारक शहीद “बिरसा मुंडा” यांना श्रमजीवी संघटनेकडून अभिवादन!

 

lead news. shriram kale