आदिवासी आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात हयगय नको : आ. सुधाकर अडबाले

'समस्‍या तुमच्या, पुढाकार आमचा' या वि.मा.शि. संघाच्या उपक्रमाअंतर्गत दिनांक १९ जून २०२४ रोजी आदिवासी विकास विभागात कार्यरत आश्रमशाळेतील शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्‍या निवारणार्थ अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर यांच्याकडे आमदार श्री. सुधाकर अडबाले यांच्या प्रमुख उपस्थितीत समस्या निवारण सभा पार पडली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि.२० : आदिवासी विकास विभागाअंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळेत कार्यरत शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन कधीच १ तारखेला होत नसल्याची ओरड बैठकीत झाली. शासनाकडून अनुदान वेळेवर येत असताना प्रकल्प कार्यालयाकडून १ तारखेला वेतन अदा करण्याबाबत योग्य ती कारवाई करण्यात येत नसल्याने वेतन उशिरा होत असल्याची नाराजी आमदार सुधाकर अडबाले यांनी व्यक्त केली. यावर अपर आयुक्तांनी जूनचे पगार १ जुलैला व दरमहा १ तारखेला न झाल्यास संबंधितांवर कारवाई करू, असे निर्देश दिले.

‘समस्‍या तुमच्या, पुढाकार आमचा’ या वि.मा.शि. संघाच्या उपक्रमाअंतर्गत दिनांक १९ जून २०२४ रोजी आदिवासी विकास विभागात कार्यरत आश्रमशाळेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्‍या निवारणार्थ अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर यांच्याकडे आमदार श्री. सुधाकर अडबाले यांच्या प्रमुख उपस्थितीत समस्या निवारण सभा पार पडली.

१९ मे २०२३ रोजी झालेल्या मागील सभेतील इतिवृत्तावर चर्चा करण्यात आली. यातील काही प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे निर्देश आमदार सुधाकर अडबाले यांनी दिले.

वरिष्ठ / निवड श्रेणीची प्रलंबित प्रकरणे, वैद्यकीय देयके, दीर्घ सुट्टी कालावधीत प्रशिक्षण आयोजित न करणे, जीपीएफ पावत्या १५ दिवसांत देण्यात यावे, शिबिर आयोजित करून दुय्यम सेवा पुस्तक देण्यात यावे, २९/०२/२०२४ च्या शासन निर्णयानुसार शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांना एकस्तर देण्याबाबत तात्काळ कार्यवाही करावी, ‘काम नाही वेतन नाही’ शासन निर्णयामुळे बाधित कर्मचाऱ्यांची त्या कालावधीची देयके मंजूर करणे व इतर सामूहिक व वैयक्तिक समस्यांवर चर्चा करून प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात यावी, असे निर्देश आमदार श्री. सुधाकर अडबाले यांनी दिले.

अहेरी प्रकल्पातील शिक्षकांच्या थांबविलेल्या वेतनवाढीबाबत चर्चा करण्यात आली. यावर प्रकल्प अधिकारी यांनी त्यांचे अधिकार नसतांना ही कारवाई केली. सर्व वेतनवाढी नियमित करण्यात येतील, असे अपर आयुक्त यांनी सांगितले. तसेच अपर आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी सर्व प्रलंबित प्रकरणे सोडविण्यासाठी सकारात्मक चर्चा केली व प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढणार असल्‍याचे आश्‍वस्‍त केले. सभेला विभागातील सर्व नऊ प्रकल्पातील प्रकल्प अधिकारी, सहायक प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार व्हि. यू. डायगव्हाणे, विभागीय अनु. आदिवासी आश्रमशाळा कर्म. संस्कृती संघटनेचे अध्यक्ष भोजराज फुंडे, सिटू संघटनेचे वि. अध्यक्ष आर. टी. खवशी, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे, जयप्रकाश थोटे, विभागीय कार्यवाह चंद्रशेखर रहांगडाले, कोषाध्यक्ष भूषण तल्‍हार, विज्‍युक्टा महासचिव डॉ. अशोक गव्हाणकर, विमाशि संघाचे नागपूर शहर अध्यक्ष विठ्ठल जुनघरे, कार्यवाह अविनाश बढे, जिल्‍हा अध्यक्ष (ग्रा.) अनिल गोतमारे, जिल्‍हा कार्यवाह संजय वारकर, अरुण कराळे, वर्धा जिल्‍हा कार्यवाह महेंद्र सालंकार, यादव धानोरकर, प्रकाश उघडे, मनोज आत्राम, किशोर पाचभाई, प्रमोद खोडे व नागपूर विभागातील आश्रमशाळेचे समस्‍याग्रस्‍त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अपर आयुक्तआदिवासी विकासआमदार सुधाकर अडबालेजिल्हाधिकारी गडचिरोलीनागपूर
Comments (0)
Add Comment