‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाद्वारे अक्षय कुमारचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई,  03 नोव्हेंबर :- महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटाद्वारे बाॅलीवूड खिलाडी अक्षय कुमार मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार शिवाजी महाराज यांची भुमिका साकारणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणे एक खुण मोठे आव्हाण आहे. या भुमिकेसाठी कठोर मेहनत करेन असे अक्षयकुमार यांनी म्हटले आहे.

बुधवारी पार पडलेल्या कार्यक्रमात अक्षय कुमार आणि महेश मांजरेकर यांच्या शिवाय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे उपस्थित होते. अक्षय कुमार यांच्या भुमिके विषयी महेश मांजरेकर म्हणाले, अक्षय सोबत काम करण्याची माझी खुप इच्छा होती. या भुमिकेसाठी मी त्याच्याशिवाय दुसरा कोणत्याच अभिनेत्याचा विचार करू शकत नाही. आम्हाला ठराविक व्यक्तिमत्व आणि लूक हवा होता. हिंदू राजाची भुमिका साकारण्यासाठी अक्षय परफेक्ट आहे.

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा चित्रपट मराठी सोबतच हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. कुरेशी प्राॅडक्शनन्स निर्मित हा चित्रपट पुढील वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हे पण वाचा :-

akshay kumarcinemadebutin Marathimade his