लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
धुळे, दि. ३ सप्टेंबर : धुळ्यातील भूषण संजय पाटील या तरुण दिग्दर्शकाला आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपटाचा मानांकन मिळाले आहे. भूषण यांनी दिग्दर्शित केलेला ‘मेल फिमेल’ या लघु चित्रपटाला दादासाहेब फाळके पुरस्कारासह आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
मेल फिमेल या लघुचित्रपटाला स्टॅण्डअलोन आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या चित्रपटाने अकरा विविध फिल्म फेस्टिवल मध्ये आपला डंका गाजवला आहे.
एका जोडप्याच्या भावनिक नात्यांची गुंतागुंत भूषण यांनी या चित्रपटांमध्ये मांडली आहे. कोरोनाच्या लाॅकडाऊन मध्ये त्यांनी हा चित्रपट धुळे शहरातच अत्यंत कमी तांत्रिक सुविधांमध्ये तयार केला आहे.
हे देखील वाचा:
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कल्पिता पिंपळे यांच्या प्रकृतीची विचारपूस