अखेर वन विभागाने महिलेला ठार करणाऱ्या टी-१३ वाघिणीलाकेले जेरबंद..

गडचिरोली,ता.२३: आरमोरी तालुक्यातील रामाळा येथे चार दिवसांपूर्वी महिलेला ठार करणाऱ्या टी-१३ या वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला आज सकाळी यश आले आहे.
१९ आॅक्टोबरला आरमोरी शहरातील काळा गोटा परिसरात राहणारी ताराबाई धोडरे ही वृद्ध महिला रामाळा येथील शेतात धान कापत असताना वाघिणीने तिच्यावर हल्ला करून ठार केले होते.
त्यानंतरही त्या परिसरात वाघिणीचा वावर अढळून येत होता. ती हल्ला करीत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्यानंतर वनविभागाने वाघिणीला पकडण्याची मोहीम सुरू केली होती.