उपासमारीची वेळ आली म्हणत कलाकार उतरले रस्त्यावर

राज्यभर रंगकर्मींचं विविध मागण्यांसाठी आंदोलन

लोकस्पर्श न्यूज टीम

मुंबई 09 :- राज्यभरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधाना शिथिलता मिळाली आहे. पण दुसरीकडं मात्र सांस्कृतिक कार्यक्रमांवर अजूनही बंदी आहे. आज राज्यभरात रंगकर्मींचा आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं.  मुंबईत परिसरातील दादासाहेब फाळके यांच्या पुतळ्यासमोर आज रंगकर्मींनी आंदोलन केलं.  गेल्या सोळा महिन्यापासून नाट्यगृह व इतर सर्व कार्यक्रम बंद असल्याने घर कसं चालवायचं ? असा प्रश्न नाट्यकलावंत समोर आहे.  या आंदोलनात कलाकारांसोबत तंत्रज्ञ व नाट्यगृह त्याचं घर चालतं, असे सर्वच जण यामध्ये सहभागी झाले आहेत. लोककलावंतांनी जागर रंगकर्मींचा हा कार्यक्रम सादर करून आपल्या मागण्या सरकार समोर मांडले आहेत.  त्यामुळे सरकारने कलाकारांना मदत मिळवून देऊन नाट्यग्रह लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी रंगकर्मींकडून केली जात आहे.

समाजातील प्रत्येक घटकाला निर्बंध मधून सूट मिळाली आहे मात्र नाट्यगृह आणि सिनेमागृह अजूनही बंद आहेत. कलाक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना अजूनही नीट बंदमधून सूट मिळालेली नाही. त्यामुळे नाट्य आणि सिनेसृष्टीतील कलाकारांसोबत लोक कलाकार देखील मोठ्या संकटात सापडले आहेत. यात सर्व कलाकारांनी आज राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. नाट्यगृह आणि सिनेमा गृह चालू करा, कलाकार बोर्डाची स्थापना करा, मानधनात वाढ करा, कायमस्वरूपी पेन्शन योजना सुरू करा अशा अनेक मागण्या करत आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील अनेक कलावंतांनी आंदोलन केले.

राज्यभरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधाना शिथिलता मिळाली आहे. पण दुसरीकडं मात्र सांस्कृतिक कार्यक्रमांवर अजूनही बंदी आहे. यामुळं रंगकर्मींनी सोमवारी नागपुरच्या संविधान चौकात पथनाट्य करत व्यथा मांडल्या. शासनाची भीक नको फक्त सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्या अशी मागणी करण्यात आली.

artistcenima hallcoviddramaloss artistpan damic