लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
देसाईगंज : झाडीपट्टीतील रंगभूमीवर आपल्या विविध कलांच्या माध्यमातून समाजाला मार्गदर्शन करण्याबरोबरच मनोरंजन करण्याचे काम कलावंत करत असतात. आपली कला जपण्यासाठी अख्खे आयुष्य खर्ची करतात मात्र उतारवयात शासनाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याने गडचिरोलीच्या शासकीय विश्रामगृह मानधन मिळण्याकरिता लढा देण्याचा निर्धार मेळाव्या आयोजित केला.
मेळाव्याला उपस्थित कलावंतांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सदरचा मेळावा २९ डिसेंबर रोजी शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे पार पडला. कलाकार नोंदणी मेळाव्याचे आयोजन गडचिरोली जिल्हाध्यक्ष धनपाल कार यांच्या हस्ते करण्यात आले. या मेळाव्यासाठी अखिल भारतीय कलावंत न्यायहक्क समिती, राष्ट्रीय अध्यक्ष सोमनाथ गायकवाड, महासचिव अॅड. श्याम खंडारे उपस्थित होते. मेळाव्यामध्ये भंडारा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील विविधस्तरीय अनेक कलावंत उपस्थित झाले होते. मेळाव्यात कलाकारांच्या मागण्या व समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
मेळाव्यास कवी, गायक, साहित्यिक, लेखक, अभिनेते, नाटककार, निर्माता, दिग्दर्शक, शास्त्रीय गायन, सुगम संगीत, संगीत विशारद, तमाशा कलावंत, वाघ्या मुरळी, गोंधळी, बहुरूपी, ह.भ.प. कीर्तनकार, वारकरी, वासुदेव, पिंगुळ, आराधी, देवदासी, पोतराज, बेंजो, ब्रास बॅण्ड वादक, संभळ, सनई वादक, मिरवणुकीतील घोडा, गाडीवाले, ऑर्केस्ट्रा, कलापथक, लावणी सम्राज्ञी, मिमिक्री, महिला पुरुष ढोलपथक, बादशहा ढोलपथक, आदिवासी कलापथक, चित्रकार, पेंटर, उर्दू कव्वाली, ख्रिस्ती भजनी मंडळ गुरुद्वारा सेवेकरी आणि विविध प्रकारचे वाद्य वाजविणाऱ्या कलावंतांनी उपस्थित राहून आपल्या कलेची नोंदणी करून घेतली आहे.
कलावंतांना दरमहा पाच हजार रुपये मानधन मिळण्याकरिता अखिल भारतीय कलावंत न्यायहक्क समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष सोमनाथ गायकवाड, हे प्रयत्न करीत असून समितीच्या पुनर्बाधणीसाठी व संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने तालुका, जिल्हा, गाव पातळीवर मेळाव्याचे आयोजन व मंडळ रजिस्ट्रेशन करण्याबद्दल माहिती अॅड श्याम दादा खंडारे यांनी आपल्या भाषणामध्ये दिली. नोंदणी मेळाव्यामध्ये जागेश्वर ठाकरे, गोवर्धन भुते, देवराव कुळमेथे, वासुदेव दुपारे, नानाजी ठाकरे, दिवाकर दरवळे, रेशीम खुणे, वंदनाताई गडे, वंदना तुपटे, प्रतिभा दिवटे, सुषमा कार, मारोती वाघाळे, पुष्पा नाकतोडे, संदिप ढोरे, देवानंद पिलारे, विजय करंडे, जीवन किनेकर, सोमा करेवार, लिलाराम देव्हाळे, कांचन दुर्गेश्वर, विजय नंदरधने उपस्थित होते.
हे ही वाचा,