१८ ते ४४ वयोगटाला तूर्त लस मिळणार नाही – आरोग्यमंत्री राजेश टोपे

१८ ते ४४ वयोगटाला तुर्त लस मिळणार नाही,” अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.

मुंबई डेस्क, दि. १२ मे : “सध्या महाराष्ट्रात ४५ वर्षांवरील नागरिकांना प्राधान्य द्यावं लागेल. या कारणाने १८ ते ४४ वयोगटाला तुर्त लस मिळणार नाही,” अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.

राजेश टोपे म्हणाले, “तुर्त महाराष्ट्रात १८-४४ वयोगटातील लसीकरण आपण स्थगित करत आहोत. सीरमचे प्रमुख आदर पुनावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. त्यांनी २० मे नंतर महाराष्ट्राला दर महिन्याला दीड कोटी डोसेस देऊ असं सांगितलंय. त्याची विगतवारी कशी करायची याबाबत ते लंडनहून भारतात आल्यावर निर्णय घेतील. ४-५ दिवसानंतर अधिक प्रमाणात लस उपलब्ध झाली की पहिल्या डोसचा निर्णय घेवू,”

“४५ वरील व्यक्तींना दुसरा डोस भारत सरकार देवू शकत नाही. त्यामुळं दुसरा डोस देणं गरजेचं आहे. असं असल्यानं महाराष्ट्र सरकारने खरेदी केलेली लस ही ४५ वर्षांवरील लोकांना दिली जाणार आहे. दुसऱ्या डोससाठी २० लाख डोस हवेत. सध्या केवळ १० लाख आहेत. पहिल्या डोसची लगेच अपेक्षा करू नये,” असंही राजेश टोपे यांनी नमूद केलं.

राजेश टोपे नेमकं काय म्हणाले?

राजेश टोपे म्हणाले, “राज्यातील लसीकरण केंद्रावर आता केवळ दुसरा डोस घेणाऱ्यांनीच यावे. पहिला डोस लसीकरण केंद्रांवर आता मिळणार नाही. पहिल्या डोसनंतर दुसरा डोस कोरोना रोखण्यासाठी तितकाच महत्वाचा आहे. राज्यात २० लाख नागरिकांना दुसरा डोस देणे बाकी आहे. अशात राज्य सरकारने लसीकरण केंद्रावर केवळ दुसरा डोस पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात सध्या १६ लाख कोविशिल्ड (Covishield), तर ४ लाख कोव्हॅक्सिन (Covaccin) अशी २० लाख लस बाकी आहे. ७ लाख कोविशिल्ड, तर ४ लाख कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांची संख्या बाकी आहे. हे लक्षात घेता सरकारने केवळ लसीकरण केंद्रांवर तूर्तास दुसऱ्या लस देण्यासाठी प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.”

हे देखील वाचा : 

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड; २ डॉक्टरसह ६ जणांना अटक

घराच्या खोदकामात सापडले मुघलकालीन नाण्यासह ४२८ ग्रॅम सोने

भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5121 जागांसाठी भरती

lead storyRajesh Tope