आवळ्याचा रस वाढवते रोग प्रतिकारशक्ती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे रोग प्रतिकार शक्ती कमकुवत होत आहे. आता हिवाळा सुरू झाला आहे. वातावरणात बदल होत आहे, त्यामुळे याचा आरोग्यावर परिणाम होउन समस्या सुरू होतात. रोग प्रतिकारशक्ती कमी होत असल्याने संसर्गजन्य रोगांचा धोका वाढतो. ज्याचा आपल्या शरीरासह डोळ्यांवरही दुष्परिणाम होतो. आयुर्वेदिक आवळ्याचे अनेक फायदे असून आवळ्याच्या रसाचा वापर केल्याने दृष्टी आणि रोग प्रतिकारशक्ती वाढते.

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आवळ्याचा ज्यूस खुप फायदेशीर आहे. यामुळे दृष्टी चांगली होउ शकते. आवळा खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते. व्हिटॅमिन-सी आणि फ्लेव्होनाॅइड्सचा त्वचेला फायदा होता. हा नैसर्गिक आवळ्याचा रस बध्दकोष्ठतेची समस्या देखील कमी करतो आणि पोटाशी संबंधित इतर आजारांवर गुणकारी सिध्द होतो.

आवळ्याचा रस डोळ्यांची दृष्टी वाढविण्यास मदत करतो. सोबतच तो आपल्या शरीराला हायड्रेट ठेवण्याचे ही काम करतो. आवळ्यामध्ये असलेले फायटोन्यूट्रिएंट्स रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत करतात. त्यामुळे डोळ्यांच्या लालसरपणा पासूनही आराम मिळतो असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हे पण वाचा :-

Amla juiceimmunityincreases