लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : ३१ डिसेंबर तसेच १ जानेवारीला नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात केले जाते. नवीन वर्षाची सुरवात शुद्धीत राहून करावी. गम्मत किंवा पार्टी म्हणून दारूच्या व्यसनाने सुरवात होऊ नये. यासाठी मुक्तिपथच्या पुढाकारातून महाविद्यालय, शाळा व शासकीय कार्यालयाच्या सहकार्यातून जिल्हाभरात ‘दारूला नाही म्हणा’ हा उपक्रम सर्वत्र राबविण्यात आला. शहरातून रॅली, नारेबाजी, बॅनरच्या माध्यमातून लक्ष वेधत जागृती करण्यात आली.
धानोरा शहरात मुक्तिपथ अंतर्गत शहरात 31 डिसेंबर निमित्त जनजागृति रॅली काढण्यात आली. शाळकरी चमू व मुक्तीपथ चमू यांच्या माध्यमातून पथनाट्य सादर करून नागरिकांना दारूमुळे होणारे नुकसान तसेच व्यसन उपचार माहिती हा संदेश देण्यात आला. यावेळी पोलीस विभाग, जिल्हा परीषद कनिष्ठ महाविद्यालय धानोरा शिक्षक वृंद, विद्यार्थी तसेच मुक्तीपथ तालुका चमू उपस्थित होते.
आरमोरी नवीन बस स्टॉप, बौद्ध विहार जूना बसस्टॉप, दुर्गामांदिर टिळक चौक, MG कॉलेज इत्यादी ठिकाणी 31 डिसेंबर दारूला नाही म्हणा, नवं वर्षाचे स्वागत शुद्धीत राहून करा, यावर पथनाट्य सादर करण्यात आले. मुक्तीपथ तालुका कार्यालय व NSS विभाग MG कॉलेज, युवा संघटना यांचे संयुक्त विद्यमाने जनजागृती रॅली व पथनात्याट्याद्वारा जनजागृती करण्यात आली. यावेळी MG कॉलेजचे प्राचार्य लालसिंग खालसा, NSS प्रमुख गजेंद्र कडाव, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप लामतुरे, ठाकरे, मुक्तीपथ तालुका टीम इत्यादी उपस्थीत होते.
सिरोंचा येथे दारू नाही म्हणा आणि शुद्धीत राहून नवीन वर्षाची सुरुवात करा. असे नारे बाजी लावत रॅली काढण्यात आली. त्यात एकूण तीन कॉलेजचे विद्यार्थी सहभागी होते. एटापल्ली शहरात रॅली तसेच मानवी साखळी तयार करून व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला. पंचायत समितीत selfie with today’s कार्यक्रम बीडीओ यांचे उपस्थित घेण्यात आला. आलापल्ली शहरात 31 डिसेंबरला दारूला नाही म्हणा व नवीन वर्षाचे स्वागत आनंदाने शुध्दीवर राहुन करा या जनजागृतीच्या कार्यक्रमाची रॅली सार्वत्रीबाई फुले महाविद्यालय इथुन व्यसनापासून दूर ठेवणारे नारे देत भव्य रॅली काढण्यात आली. हा उपक्रम राबविण्यासाठी तालुका प्रभारी नंदिनी आशा, नितीन पोटे, महेन्द्र उसेंडी, स्पार्क कार्यकर्ते, MHD संयोजक दशरथ रमखाम यांनी सहकार्य केले. रॅलीत 500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
चामोर्शी शहरात हरडे वाणिज्य महाविद्यायाच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जागृती रॅली काढण्यात आली. मूलचेरा येथे “31 डिसेंबर दारूला नाही म्हणा” नविन वर्षाचे स्वागत शुद्धीत राहून आनंदात साजरा करा. असा सामाजिक संदेश स्व.मल्लाजी आत्राम महाविद्यालय मूलचेरा येथील विद्यार्थ्यांनी रॅलीच्या माध्यमातून दिला.
कुरखेडा शहरात 31 डिसेंबर दारूला नाही म्हणा व येणाऱ्या वर्षाचे स्वागत आनंदाने करूया या जनजागृतीच्या कार्यक्रमाची रॅली श्रीराम विद्यालय येथून काढण्यात आली. यात एकूण 617 विद्यार्थी रॅलीमध्ये सहभागी होते. दरम्यान, माजी आमदार कृष्णा गजबे यांनी रॅलीला भेट देऊन विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीसाठी प्रोत्साहित केले. यावेळी श्री गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी वामनराव फाये, अशोक मेश्राम, समाजसेविका कविता खडसे, विमल गुंडरे, कमलताई मेश्राम, उर्मिला बनसोड, संगीताताई जुमनाके, प्राचार्य नागेश फाये, कावळे, दखणे, उईके, कवाडकर , पाटणकर, कटिंग, नागपूरकर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील गरदास, लोणगोटे, सातपुते, शेंडे, बूराडे, वालदे, पत्रे, रामटेके, पोलीस विभागातर्फे पीएसआय भोम्बे, साबले, माजी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, डॉ जगदीश बोरकर, डॉ रमेश कटरे, अँड उमेश वालदे, प्राचार्य देवेंद्र फाये, विवेक निरंकारी, उल्लास देशमुख, ज्ञानेश्वर कागदे मुक्तीपथ तर्फे शारदा मेश्राम , जीवन दहीकर व स्पार्क कार्यकर्ते महेश खोब्रागडे हे उपस्थित होते.
हे ही वाचा,
गडचिरोली पोलीस दलातर्फे रेझिंग डे निमीत्त करण्यात आले पथसंचलन
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसा