लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 4 जून : महाराष्ट्र राज्यात दिनांक 13.03.2020 पासून साथरोग अधिनियम 1897 ची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. कोविड-19 साथरोग देशातील जवळपास सर्वच भागात पसरलेली आहे, ज्यामुळे मार्च 2020 ते आजतगायत सदर साथरोगावर उचित प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेकामी प्रशासकीय यंत्रणा विशेषत: आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटत आहे.
सदर आजाराचे योग्य वेळीस निदान व योग्य उपचार केल्यास या आजारातून व्यक्ती बरे होऊ शकतात. तसेच सदर आजारावर वैद्यकीय संशोधनाअंती लस तयार करण्यात आले असून “कोविड-लसीकरण” मोठ्या प्रमाणावर झाल्यास या आजाराची व्याप्ती कमी होऊन सदर साथरोगावर उचित नियंत्रण मिळविणे शक्य आहे.
ज्याकरिता कोविड-लसीकरण मोहिमेतंर्गत सर्वप्रथम आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी व त्यानंतर शासकीय अधिकारी-कर्मचारी, 45 वर्षे वयापुढील व्यक्ती, 18-44 वर्षातील नागरिक यांना गडचिरोली जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत लसीकरण उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यातील सद्या 45 वर्षावरील नागरिकांना लसीकरण देणेत येत आहे.पुढिल काळात इतर वयोगटासाठी लस उपलब्ध होणार आहे.
कोविड लसीकरण संदर्भात आरोग्य विभागाचे प्राथमिक माहितीनुसार आजरोजी भारत देशात एकूण 17.84 कोटी नागरिकांना प्रथम डोस तर 4.56 कोटी नागरिकांना दुसरे डोस देण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र राज्यात एकूण 1.86 कोटी नागरिकांना प्रथम डोस तर 46 लक्ष नागरिकांना दुसरे डोस देण्यात आले आहे.
तर गडचिरोली जिल्ह्यातील एकूण 1,33,071 नागरिकांना प्रथम डोस तर 34,808 नागरिकांना दुसरे डोस देण्यात आले असून यापैकी देशात, राज्यात कोणतेही नागरिक प्रथम वा दुसरे डोस घेतल्यामुळे म्हणजेच लसीकरणामुळे मृत झाल्याचे आढळून आले नाही. तसेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोविड लसीकरणामुळे कोणतेही मृत्युची नोंद नाही. कोविड लसीकरण करुन घेणे हे योग्य व सुरक्षित आहे.
भविष्यात कोविड ची तिसरी लाट येण्याची शक्यता नाकरता येत नाही व यात विशेषत: लहान मुलांना धोका असू शकता तेव्हा तेव्हा अफवांवर विश्वास न ठेवता सर्व नागरिकांना प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी स्वत:च्या, स्वत:च्या मुलांच्या व सर्वांच्या आरोग्यासाठी लवकरात लवकर आपले पूर्ण लसीकरुन करुन घ्यावे जेणेकरुन आपण सर्वजण सदर साथरोगावर नियंत्रण मिळविण्यात यशस्वी होऊ अशा प्रकारचे आवाहन करण्यात आले आहे.
हे देखील वाचा :
अनाधिकृत प्रयोगशाळा (लॅब) चालकांवर कारवाई करा : संतोष ताटीकोंडावार यांची निवेदनातून मागणी
कोविड पश्चात मृत्यू झालेल्यांना शासकीय मदतीबाबत चुकीच्या अफवावर विश्वास ठेवू नये