२१ जून आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्याचे आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, १८  जून :  भारत सरकार आयुष मंत्रालय, नवी दिल्ली यांनी दिलेल्या निर्देशानुसार २१ जून या दिवशी संपुर्ण जगतात आंतरराष्ट्रीय योगदिवस साजरा होत असतो.

यावर्षी आंतरराष्ट्रीय योगदिनाचे हे सातवे वर्ष असून २१ जून या योगदिनानिमित्याने जगभरात योगासनाची परंपरा स्विकारणे व अमलात आणने ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे. कारण योग हा आपल्या भारताच्या सांस्कृतिक वारसाचा अविभाज्य भाग आहे. आयुष मंत्रालयाच्यावतीने आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या आयोजनामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, अशी अपेक्षा आहे.

त्यामुळे कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी शाळा, आश्रमशाळा, महाविद्यालय, क्रीडा मंडळे, व्यायामशाळा, युवक कल्याण मंडळांनी कोरोना नियमाचे पालन करुन सकाळी ७ ते ८ यावेळेत ऑनलाइन पद्धतीने योगदिनाचे आयोजन करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, घनश्याम राठोड यांनी केले आहे.

हे देखील वाचा :

ब्रेकिंग : नवेगाव येथे राहत्या घरी पती व पत्नीचा मृतदेह आला आढळून !

‘त्या’ दोन अभिनेत्रींना चोरीच्या आरोपाखाली अटक

 

International Yoga Daylead story