पारबताबाई विद्यालयात रक्तदान शिबीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली दि.२२ डिसेंबर :- कोरची येथील पारबताबाई विद्यालयात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी आबाजी आत्राम, मुख्याध्यापक शालीकराम कराडे, नगरसेवक मनोज अग्रवाल, माजी नगराध्यक्ष नसरुद्दीन भामाणी,नंदकिशोर वैरागडे,ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.

ब्लड डोनर ग्रुप कोरची च्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आले.या वेळी ३३ रक्तदात्यानी रक्तदान केले. आजची कोरोना संसर्गामुळे आणि ईतर रूग्णांना भासणारी रक्ताची गरज लक्षात घेता येथील सुरज हेमके, आषीष अग्रवाल,नसरूद्धीन भामाणी, ईत्यादी नव युवकांनी रक्तदानाची कल्पना मांडली आणि  सोसल मिडीयावर रक्तदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले. त्यानंतर बरेच लोकानी  स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्यासाठी समोर आले.