अहेरीत सिकलसेल सप्ताह साजरा

विविध आजारावर काळजी घेण्या संदर्भात उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी यांनी केले मार्गदर्शन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी, दि. १८ डिसेंबर:- उपजिल्हा रुग्णालय अहेरीच्या वतीने दिनांक 11 ते 17 डिसेंबर दरम्यान सिकलसेल आजार नियंत्रण सप्ताह साजरा करण्यात आले.

सिकलसेल आजार नियंत्रण सप्ताह उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ कन्ना मडावी यांच्या मार्गदर्शनात धर्मराव कृषी विद्यालय अहेरी, भगवंतराव हायस्कूल अहेरी, अंगणवाडी केंद्र खमनचेरु, राणी दुर्गावती हायस्कूल आलापल्ली इत्यादी शाळेमध्ये सिकलसेल विषयी मार्गदर्शन करुन तपासणी शिबिर कार्यक्रम राबविण्यात आले.

या कार्यक्रमासाठी उपजिल्हा रुग्नालयातील समुपदेशन मनीषा कांचनवार ,गोपाल कोडापे यांनी सिकलसेलसंदर्भात विशेष मार्गदर्शन करून भावी पिढीला होणारा आजार कसा टाळता येतो या विषयी अधिक मार्गदर्शन केले. तसेच सध्या जगभरात covid-19, तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, किशोरवयीन मुलीचे आरोग्य कसे जोपासावे त्यामुळे होणारा आजार कसा टाळता येईल. त्यासाठी कशी काळजी घ्यावी. या बद्दल विविध आजारांची विशेष माहिती पटवून देण्यात आली.
या शिवाय सिकलसेल प्रयोगशाळा तंत्रज्ञ संदीप डेकाटे, श्रेया आईंचवार ,शेवंता चौधरी यांनी उपस्थित असलेल्या गरोदर मातांची तपासणी करून संशयितांचे रक्ताचे नमुने पुढील तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे पाठविण्यात आले .या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी व शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनी मोलाचे मार्गदर्शन आणी सहकार्य केले.