दिलासादायक ! गडचिरोली जिल्ह्यात आज तब्बल 550 कोरोनामुक्त, 276 नवीन कोरोना बाधित तर 12 रुग्णांचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 15: आज जिल्हयात 276 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 550 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 27102 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 23624 वर पोहचली. तसेच सद्या 2863 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 615 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 12 नवीन मृत्यूमध्ये ता. वडसा जि. गडचिरोली येथील 62 वर्षीय पुरुष, गडचिरोली  येथील 50 वर्षीय पुरुष,  गडचिरोली  येथील 75 वर्षीय महिला, ता. कुरखेडा जि. गडचिरोली येथील 56 वर्षीय महिला, ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 65 वर्षीय पुरुष, ता. मुलचेरा जि. गडचिरोली येथील 40 वर्षीय महिला, गडचिरोली येथील 48 वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील 50 वर्षीय महिला, ता.आरमोरी जि. गडचिरोली येथील 60 वर्षीय महिला,  ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील 62 वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील 40 वर्षीय महिला, ता. कुरखेडा जि. गडचिरोली येथील 68 वर्षीय पुरुष यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.17 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 10.56 टक्के तर मृत्यू दर 2.27 टक्के झाला.

नवीन 276 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 75, अहेरी तालुक्यातील 29, आरमोरी 07, भामरागड तालुक्यातील 04, चामोर्शी तालुक्यातील 65, धानोरा तालुक्यातील 6, एटापल्ली तालुक्यातील 14, कोरची तालुक्यातील 11, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 7, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 13, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 14 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 31 जणांचा समावेश आहे.

तर आज कोरोनामुक्त झालेल्या 550 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 191, अहेरी 42,  आरमोरी 63, भामरागड 11, चामोर्शी 46, धानोरा 15, एटापल्ली 24, मुलचेरा 17, सिरोंचा 21, कोरची 24, कुरखेडा 35 तसेच वडसा येथील 61 जणांचा समावेश आहे.

 

हे देखील वाचा : 

महिलांची प्रगती म्हणजे समाजाची प्रगती : भदंत डॉ. चंद्रकीर्ती

मुंबई उच्च न्यायालयात 40 जागांसाठी भरती

(WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये स्टाफ नर्स च्या ५६ जागांसाठी भरती

 

 

Gadchiroli Coronalead story