दिलासादायक! गडचिरोली जिल्ह्यात आज 416 कोरोनामुक्त, 137 नवीन कोरोना बाधित तर 7 जणांचा कोरोनाने मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 17 मे : आज जिल्हयात 137 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 416 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 27479 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 24453 वर पोहचली. तसेच सद्या 2396 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 630 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 7 नवीन मृत्यूमध्ये  61 वर्षीय  पुरुष ता. सावली जि. चंद्रपूर, 40 वर्षीय पुरुष कुरखेडा, 54 वर्षीय पुरुष शिक्षक कॉलनी गडचिरोली, 38 वर्षीय पुरुष घारगांव ता. चामोर्शी , 54 वर्षीय पुरुष कोटगल, गडचिरोली, 81 वर्षीय पुरुष माडा कॉलनी वडसा , 40 वर्षीय महिला टेकडा, ता. सिंरोचा यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.99 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 8.72 टक्के तर मृत्यू दर 2.29 टक्के झाला.

नवीन 137 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 51, अहेरी तालुक्यातील 03, आरमोरी 13, चामोर्शी तालुक्यातील 26,धानोरा तालुक्यातील 01, एटापल्ली तालुक्यातील 05, कोरची तालुक्यातील 05,कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 07, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 18, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 04 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 04 जणांचा समावेश आहे.

तर आज कोरोनामुक्त झालेल्या 416 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 102, अहेरी 69,  आरमोरी 64, भामरागड 09, चामोर्शी 34, धानोरा 12, एटापल्ली 26, मुलचेरा 07, सिरोंचा 23, कोरची 04, कुरखेडा 21 तसेच वडसा येथील 45 जणांचा समावेश आहे.

हे देखील वाचा :

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपाययोजना करा – खा. अशोक नेते

‘ग्लोबल अँँप्रूवल रेटिंग’ च्या आकडेवारीनुसार पंतप्रधान मोदींची लोकप्रियता घटली; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा बसला फटका

 

corona gadchirolilead story