संकटकालीन बालकांसाठी कोविड काळात मदतीबाबत संपर्क साधा – जिल्हा महिला व बाल विकास आधिकारी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : कोविड -19 महामारीच्या काळात ज्या बालकांचे पालक मृत्यूमुखी पडलेले आहे. अशा बालकांसाठी तसेच ज्या बालकांचे दोन्ही पालक रुग्णालयामध्ये दाखल असल्याने त्यांची देखभाल होऊ शकत नाही. अशा बालकांच्या सर्व प्रकारच्या मदतीस महाराष्ट्र शासनाने जिल्हा स्तरीय कृतीदलाची स्थापना केली आहे. या बालकांना संरक्षण, संगोपन, कायदेशीर हक्क व पुनर्वसन इ. सुविधा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी जिल्हास्तरीय कृतीदलाची आहे.

सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की अशी संकटामध्ये सापडलेली बालके आपणास आढळुन आल्यास अथवा माहिती मिळाल्यास कृपया पुढील क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा.

जिल्हा महिला व बाल विकास, विभाग गडचिरोली संपर्क क्रमांक 07132 222645

महिला व बाल विकास विभाग मदत कक्ष संपर्क केंद्र 8308992222 7400015518

जिल्हा बाल संरक्षण कक्ष गडचिरोली संपर्क क्रमांक 9403704834, 9975033601, 9595644848

बाल कल्याण समिती गडचिरोली संपर्क क्रमांक- 8669291941, 9422551234,9405940826

चॉईल्ड लॉईन टोल फ्रि क्रमांक- 1098 ,

बाल गृह संपर्क क्रमांक – 9356522511 या क्रमांकावर संपर्क करावा.

सर्व नागरीकांना कळविण्यात येते की, कोवीड – 19 मुळे दोन्ही पालक मृत्यू पावल्या आहे. अशा बालकांची माहिती बाल कल्याण समिती, गडचिरोली व जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय तसेच चॉईल्ड लॉईन टोल फ्रि क्रमांक 1098 यावर तात्काळ माहिती देण्यात यावी जेणे करुन सदर बालकांना आवश्यक मदत वेळेत पुरवता येईल. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा महिला अधिकारी कार्यालय, गडचिरोली बॅरेक क्रमांक 1, खोली क्रमांक 26,27 कलेक्टर कॉम्प्लेक्स, गडचिरोली, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, गडचिरोली  यांचाशी संपर्क साधावा असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

हे देखील वाचा :

(BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 567 जागांसाठी भरती

मुंबई उच्च न्यायालयात 40 जागांसाठी भरती

 

corona careGadchirolilead story