चंद्रपूरात नविन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हेलिपॅड आणि एस्केलटर सुविधा

600 खाटांचा आणि 700 कोटी रु. खर्चाचा प्रकल्प आलाय पूर्णत्वास.. 600 खाटांचा आणि 700 कोटी रु. खर्चाचा प्रकल्प आलाय पूर्णत्वास.. 600 खाटांचा आणि 700 कोटी रु. खर्चाचा प्रकल्प आलाय पूर्णत्वास..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

चंद्रपूर : शहरातील बल्लारपूर बायपास मार्गावर 2017 साली भूमिपूजन झालेला प्रकल्प 95 टक्के पूर्ण झालाय. 600 खाटांचा आणि 700 कोटी रु. खर्चाचा प्रकल्प पूर्णत्वास आला असून सर्वोत्तम वैद्यकीय उपकरणे आणि साहित्य यामुळे नक्षलग्रस्त आणि आदिवासी- मागास भागात नव्या सुविधेचा उदय होणार आहे. रुग्णालय, वर्गखोल्या, प्रयोगशाळासह एकूण 19 वेगवेगळ्या विभागांच्या 18 अत्याधुनिक इमारती रुग्णसेवेत रुजू होणार आहेत.

50 एकर परिसरातील इमारती पुढील टप्प्यात ग्रीन एनर्जी अनुकूल केल्या जाणार आहेत. 7 वर्षे रखडलेला प्रकल्प 4 महिन्यात पूर्ण होत असून 17 विभागातील पदव्युत्तर शाखांचे अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. या परिसरात स्थळ सौंदर्यीकरण आणि मनोहारी लँडस्केपिंग करण्यात आले आहे. याच आवारात उभारण्यात आलेल्या टाटा कॅन्सर रुग्णालयाने विदर्भाच्या आरोग्य सेवा क्षेत्रात नव्या दालनाची सुरुवात होणार आहे.

हे हि वाचा,