गडचिरोली जिल्ह्यात आज 228 कोरोनामुक्त तर 7 मृत्यूसह 385 नवीन कोरोना बाधित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 12 मे : आज जिल्हयात 385 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 228 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 26369 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 22002 वर पोहचली. तसेच सद्या 3792 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 575 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 7 नवीन मृत्यूमध्ये ता. भामरागड जि. गडचिरोली येथील 53 वर्षीय पुरुष, ता. अहेरी जि. गडचिरोली येथील 62 वर्षीय महिला, ता. कुरखेडा जि. गडचिरोली येथील 65 वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील 28 वर्षीय पुरुष, ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 53 वर्षीय पुरुष, ता. अहेरी जि. गडचिरोली येथील 55 वर्षीय पुरुष, ता. कुरखेडा जि. गडचिरोली येथील 58 वर्षीय पुरुष यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.44 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 14.38 टक्के तर मृत्यू दर 2.18 टक्के झाला.

नवीन 385 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 96, अहेरी तालुक्यातील 53, आरमोरी 17, भामरागड तालुक्यातील 6, चामोर्शी तालुक्यातील 66, धानोरा तालुक्यातील 21, एटापल्ली तालुक्यातील 13, कोरची तालुक्यातील 9, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 18, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 14, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 20 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 52 जणांचा समावेश आहे.

आज कोरोनामुक्त झालेल्या 228 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 123, अहेरी 13,  आरमोरी 12, भामरागड 2, चामोर्शी 13, धानोरा 5, एटापल्ली 3, मुलचेरा 4, सिरोंचा 37, कोरची 3, कुरखेडा 3 तसेच वडसा येथील 10 जणांचा समावेश आहे.

हे देखील वाचा :

घराच्या खोदकामात सापडले मुघलकालीन नाण्यासह ४२८ ग्रॅम सोने

घाणपाण्यामुळे वनवसाहतीतील परिवारांचे आरोग्य धोक्यात

Gadchiroli Coronalead story