गडचिरोली जिल्ह्यात ९ मृत्यूसह आज ३२८ नवीन कोरोना बाधित तर १४५ कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. १५ एप्रिल: आज जिल्हयात ३२८ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज १४५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित १३५८५ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या ११०६८ वर पोहचली. तसेच सद्या २३४३ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण १७४ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज ९ नवीन मृत्यूमध्ये गडचिरोली तालुक्यातील अमिर्झा येथील ७२ वर्षीय व ५० वर्षीय दोन महिला,  कानचपूर ता. मुलेचरा ४३ वर्षीय पुरुष,  रेड्डी गोडावून गडचिरोली ४६ वर्षीय पुरुष,  गोकूल नगर गडचिरोली ५५ वर्षीय पुरुष, वनश्री कॉलनी गडचिरोली ५८ वर्षीय महिला , मानगडा ता. आरमोरी ६८ वर्षीय महिला, पिंपलगांव ता. लाखानदूर जिल्हा भंडारा ६५ वर्षीय पुरुष, शारदा कॉलनी ता. ब्रम्हपूरी जिल्हा चंद्रपूर येथील ५९ वर्षीय पुरुष इ.चा मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.४७ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण १७.२५ टक्के तर मृत्यू दर १.२८ टक्के झाला.

           नवीन ३२८ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १४५, अहेरी तालुक्यातील ३२, आरमोरी २४, भामरागड तालुक्यातील २३, चामोर्शी तालुक्यातील १९, धानोरा तालुक्यातील ०६,  एटापल्ली तालुक्यातील १४, कोरची तालुक्यातील ०७,  कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये १४, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये ३, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये ८ तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये २८ जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या १४५ रूग्णांमध्ये गडचिरोली मधील ३५, अहेरी १४,  आरमोरी ०७, भामरागड २१, चामोर्शी २२, धानोरा ०६, एटापल्ली १, मुलचेरा ५, सिरोंचा ७, कोरची ५, कुरखेडा ७, तसेच वडसा १५ येथील जणाचा समावेश आहे. तर इतर जिल्हयातील बाधितामध्ये ५ जणांचा समावेश आहे.

Gadchiroli Corona Report News Today