गडचिरोली जिल्ह्यात आज 379 कोरोनामुक्त, 204 नवीन कोरोना बाधित तर 13 जणांचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 21 : आज जिल्हयात 204 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 379 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 28362 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 25760 वर पोहचली. तसेच सद्या 1932 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 670 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 13 नवीन मृत्यूमध्ये 45 वर्षीय पुरुष आरदा ता. सिंरोचा, 50 वर्षीय पुरुष गोंड मोहल्ला ता. चामोर्शी, 82 वर्षीय पुरुष विठ्ठलपूर ता.चामोर्शी,67 वर्षीय पुरुष अंधारी ता. कुरखेडा, 50 वर्षीय पुरुष मुरखडा चेक ता. चामोर्शी, 72 वर्षीय पुरुष दर्शनी चेक ता. गडचिरोली, 60 वर्षीय पुरुष विवेकानंद नगर गडचिरोली, 75 वर्षीय पुरुष आरमोठी ता. आरमोरी, 44 वर्षीय महिला नेताजी नगर ता. चामोर्शी, 57 वर्षीय पुरुष वडसा, 62 वर्षीय महिला मुलचेरा,72 वर्षीय पुरुष इटखेडा ता. अर्जुनी जि. गोंदिया, 60 वर्षीय पुरुष राजंनगट्टा ता. चामोर्शी याचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.83 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 6.81 टक्के तर मृत्यू दर 2.36 टक्के झाला.

नवीन 204 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 53, अहेरी तालुक्यातील 26, आरमोरी 00, भामरागड तालुक्यातील 04, चामोर्शी तालुक्यातील 39, धानोरा तालुक्यातील 04, एटापल्ली तालुक्यातील 04, कोरची तालुक्यातील 01, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 10, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 14, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 26 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 23 जणांचा समावेश आहे.

तर आज कोरोनामुक्त झालेल्या 379 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 95, अहेरी 52, आरमोरी 17, भामरागड 06, चामोर्शी 64, धानोरा 21, एटापल्ली 13, मुलचेरा 14, सिरोंचा 20, कोरची 09, कुरखेडा 16 तसेच वडसा येथील 52 जणांचा समावेश आहे.

हे देखील वाचा :

पोलीस नक्षल चकमकीत कसनसुर दलमच्या १३ नक्षल्यांच्या खात्मा

corona gadchirolilead story