गडचिरोली जिल्ह्यात आज २ मृत्यूसह २१९ नवीन कोरोना बाधित तर ३७ कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. ८ एप्रिल: जिल्हयात आज २१९ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज ३७ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित ११६०२  पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या १०४४२ वर पोहचली. तसेच सद्या १०३६ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण १२४ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज दोन नवीन मृत्यूमध्ये  वनश्री कॉलोनी गडचिरोली येथील ५३ वर्षीय  पुरुष व भामरागड येथील ७३ वर्षीय  महिला अशा दोघांचा  समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.०० टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ८.९३ टक्के तर मृत्यू दर १.०७ टक्के झाला.

वीन २१९ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ७७, अहेरी तालुक्यातील २३, आरमोरी ११, भामरागड तालुक्यातील ३०, चामोर्शी तालुक्यातील ६, धानोरा तालुक्यातील १३,  एटापल्ली तालुक्यातील १३, कोरची तालुक्यातील ९,  कुरखेडा  तालुक्यातील बाधितामध्ये ३, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये १२ तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये १७ व इतर जिल्हयातील  बाधितामध्ये ५ जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या ३७ रूग्णांमध्ये गडचिरोली मधील २८, अहेरी १, भामरागड ०७, कुरखेडा १ येथील जणाचा समावेश आहे.

काल सायंकाळपर्यंत लसीकरणाचे तपशील – जिल्हयातील शासकीय ६७ व खाजगी २ अशा मिळून ६९ बुथवर  काल पहिला लसीकरणाचा डोज ३३०४ व दुसरा डोज २९२ नागरिकांना दिला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पहिला डोस ४०५०२ तर दुसरा डोज १०४५५ नागरिकांना देण्यात आला आहे.

Gadchiroli Corona