राज्यात चिकनगुनियाचे रुग्ण संख्येत वाढ, ऐन थंडीत हातपायांना ठणक,

गेल्या सहा वर्षांच्या तुलनेत २०२४ मध्ये सापडले सर्वाधिक ५ हजार ७५७ रुग्ण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई :  राज्याच्या आरोग्य विभागाने राज्यातील  पालिकेच्या चालचलाऊ कामकाजावर तीव्र  नाराजी व्यक्त केलेली आहे. ऐन थंडीच्या दिवसात नागरिकांच्या हात पाय दुखत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. मुंबईसह  राज्यातील अनेक शहरात चिकनगुनियाचे रुग्ण संखेत वाढ झाल्याचे दिसत आहे. .चिकनगुनिया हा विषाणूजन्य आजार असून एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टस डासांच्या संक्रमित मादीपासून फैलावतो.

राज्यात थंडीचा कडाका पु्न्हा वाढलेला आहे. तर मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता कमालीची खालावली आहे. महापालिका क्षेत्रात न्यूमोनिया, चिकनगुनिया आणि विषाणूजन्य आजारात वाढ झाली आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत चिकनगुनियच्या रुग्ण संख्येत ४० टक्क्यांनी वाढ झाल्याचे आरोग्य विभागाचे आकडेवारी वरून दिसून येत आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्य खात्याने महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर ताशेरे ओढले आहेत.

राज्यात चिकनगुनियाने हातपाय पसरले आहे. राज्यात रुग्ण संख्या वाढली आहे. गेल्या सहा वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक ५ हजार ७५७ रुग्ण २०२४ मध्ये सापडले आहेत. ऐन थंडीत नागरिकांच्या हातपायांना ठणक लागली आहे. राज्यातील अनेक शहरात चिकनगुनियाचे रुग्ण वाढले आहे. तर नागपूर येथे सर्वाधिक रुग्ण आढळले आहे.

राज्यात चिकुनगुनियाचे रुग्ण संख्येचा आलेख वाढल्याचे दिसून येत आहेत. गेल्या सहा वर्षांच्या तुलनेत सन २०२४ मध्ये सर्वाधिक ५ हजार ७५७ रुग्णसापडले आहेत. त्यात नागपूर शहर पहिल्या क्रमांकावर तर मुंबई शहर दुसऱ्या क्रमांकावर आहे. यंदा रुग्ण मोठ्या संख्येने वाढल्याने वैद्यकीय  क्षेत्रात  चर्चेचा विषय झाला आहे. १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या दरम्यान मुंबईत ७३५ रुग्णांची नोंद झाली आहे. नागपूर आणि पुण्यानंतर मुंबईत रुग्ण संख्या वाढलेली आहे. राज्याच्या आरोग्य विभागामार्फत रूग्ण शोधण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे.

हे ही वाचा,

सरसकट पासचे धोरण शासनाने केले रद्द,आता पाचवी व आठवीचा मार्ग सरळ, सोपा नाही !

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष पदाबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता !

‘पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 2000 रुपये;

विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र गडचिरोली येथे “शिक्षकांची पर्यावरण शिक्षण” कार्यशाळा संपन्न

 

चिकनगुनिया हा विषाणूजन्य आजार असून एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टस डासांच्या संक्रमित मादीपासून फैलावतोतीन वर्षांच्या तुलनेत चिकनगुनियच्या रुग्ण संख्येत ४० टक्क्यांनी वाढ झाल्याचे आरोग्य विभागाचे आकडेवारी वरून दिसून येतमुंबईसह  राज्यातील अनेक शहरात चिकनगुनियाचे रुग्ण संखेत वाढ